Home latest News ‘ती’ संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर बलात्कार झाला नसता, महिला आयोगाच्या सदस्याचे...

‘ती’ संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर बलात्कार झाला नसता, महिला आयोगाच्या सदस्याचे मत

98

‘ती’ संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर बलात्कार झाला नसता, महिला आयोगाच्या सदस्याचे मत

उत्तर प्रदेश:- बदायू येथील बलात्कार पीडितेबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी व्यक्त केलेल्या मताबद्दल आश्चर्य निर्माण झाले आहे. ती महिला संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडली नसती तर बलात्काराची घटना टळली असती असे त्यांनी म्हटले आहे.

बदायूमध्ये गेल्या 3 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. संध्याकाळी देवदर्शनासाठी घराबाहेर गेलेल्या त्या महिलेवर पाशवी बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या महिलेच्या पुटुंबीयांची भेट घेण्यासाठी महिला आयोगाने चंद्रमुखी देवी यांना पाठवले होते. ‘त्या महिलेने वेळेचे भान ठेवून घराबाहेर पडायला नको होते किंवा घरातील कुणीतरी तिच्याबरोबर असायला हवे होते. त्यामुळे तिचे प्राण वाचले असते.’ असे मत त्यांनी भेटीनंतर व्यक्त केले.

चंद्रमुखी देवी यांच्या या मतावर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी त्याबाबत सारवासारव करत ‘कुणीही महिला तिच्या मर्जीने आणि तिला वाटेल त्या क्षणी पुठेही फिरू शकते,’ असे म्हटले आहे.