चंद्रपूर महानगर भाजपा व भाजयुमोचा संयुक्त उपक्रम भाजपाच्या ४१ व्या स्थापना दिनाला ४१ युवकांचे रक्तदान.

59

चंद्रपूर महानगर भाजपा व भाजयुमोचा संयुक्त उपक्रम भाजपाच्या ४१ व्या स्थापना दिनाला ४१ युवकांचे रक्तदान.

शेवटचा माणूस केंद्रस्थानी ठेवून सेवाकार्य करा- डॉ.मंगेश गुलवाडे

चंद्रपूर महानगर भाजपा व भाजयुमोचा संयुक्त उपक्रम भाजपाच्या ४१ व्या स्थापना दिनाला ४१ युवकांचे रक्तदान.
चंद्रपूर महानगर भाजपा व भाजयुमोचा संयुक्त उपक्रम भाजपाच्या ४१ व्या स्थापना दिनाला ४१ युवकांचे रक्तदान.

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी व भाजयुमो महानगर चंद्रपुर तर्फे भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय जटपूरा गेट येथे मंगळवार ६एप्रिल ला स.१० ते दू २वाजता दरम्यान करण्यात आले.यात ४१ भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून भाजपाच्या विचारांना घरोघरी पोहचवून शेवटच्या माणसाची सेवा करण्याचा संकल्प केला.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, उपाध्यक्ष सुरज पेदूलवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, महामंत्री प्रज्वलंत कडू, सुनील डोंगरे, प्रमोद क्षीरसागर, रामकुमार आक्कपेल्लीवार, डॉ कीर्ती साने यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
यावेळी भारतमातेचे पूजन करून डॉ मंगेश गुलवाडे यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदान शिबिराचे विधिवत उदघाटन केले.कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले,कोरोनाच्या संकटात युवकांनी केलेले रक्तदान संजीवनी सारखेच आहे.भाजपाचे विचार देशभक्ती जागवणारे विचार आहेत.समाजातील शेवटचा माणूस आमच्या केंद्रस्थानी असून त्याची सेवा हेच आमचे ध्येय असायला हवे,असे ते म्हणाले.या प्रसंगी त्यांनी रक्तदानाचे महत्व स्पष्ट केले.

याप्रसंगी प्रास्ताविकात,विशाल निंबाळकर यांनी,रक्तदान शिबिराची भूमिका विशद केली. हे रक्त, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता ,शासकीय यंत्रणेमार्फत गरजू रुग्णांना पुरविले जाणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी ४१ युवकांनी रक्तदान केले. ज्यात प्रामुख्याने हिमांशू गादेवार, गणेश रामगुंडावार, अमित गौरकार, संजय पटले,अक्षय शेंडे,राहुल पाल, आदित्य डावरे, साजिद कुरेशी, आकाश म्हस्के, श्रीकांत एलपुलवार, तूकेश एकोणवार, सतीश तायडे, आशिष ताजणे, आकाश ठुसे, तुषार मोहुर्ले, स्नेहित लांजेवार रामजी हरणे, प्रणय डंबारे यांचा प्रामुख्याने समावेश होता.