Home latest News दोन वर्षात झाली सिमेंट रोड ची दुरवस्था, शासनाचे करोडो रुपये खर्च करून...

दोन वर्षात झाली सिमेंट रोड ची दुरवस्था, शासनाचे करोडो रुपये खर्च करून झाले निरर्थक.

74

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूर क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने विशेष फंडातून मंजूर जवळपास सव्वा कोटी रुपये खर्च करून चंद्रपूर शहर येथील राधाकृष्ण सभागृह पासून तर वृंदावन नगर येथील बुद्ध विहार पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाचा पैसा खर्च करून सुद्धा दोन वर्षाचा अल्प कालावधीतच रस्त्यांची अतिशय दुर्दशा झालेली आहे. नियोजन शून्यता आणि अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दोन वर्षातच सिमेंट निघून गिट्टी निघालेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे भेगा पडल्या आहेत रस्त्यासाठी करोडो रुपये मंजूर करून आपल्या मर्जीतील लोकांना कन्ट्रक्शन मिळवून देणाऱ्या लोक नेत्यांचा या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. नगरसेवकाकडे आणि अधिकारी वर्गाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेता त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी अथवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल. अशी यंग चंदा ब्रिगेडचे युवा नेता दिनेश इंगळे व परिसरातील नागरिकांनी मागणी केलेली आहे.