पाचोरा ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांवर नक्कीच उपचार होतो की अत्याचार?

62

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांवर नक्कीच उपचार होतो की अत्याचार?

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांवर नक्कीच उपचार होतो की अत्याचार?
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांवर नक्कीच उपचार होतो की अत्याचार?

✒️विशाल सुरवाडे, जळगाव जिल्हा प्रतिनिधी ✒️
जळगाव,दि.8 एप्रिल:- जळगाव जिल्हात मोठ्या प्रमाणावर आरोग्य विभागात हलगर्जी कारभार सुरु असल्याचे समोर आले आहे. या हलगर्जी कारभारा मुळे अनेक लोकांना आपल्या जीवाला मुखाव लागत असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्ते करत आहे. यांची चौकशी करुन आरोग्य विभागावर करवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जळगाव जिल्हातील पाचोरा ग्रामीण रुग्णालयात कमलाबाई कोळी या महिलेला दाखल करण्यात आहे. रुग्णालयातील डॉक्टरने रेमडिसिवर इंजेक्शन लिहुन दिलेले असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला संपर्क केला. त्यानुसार त्यांनी रुग्णाचे त्यांचे रिपोर्ट व दुरवस्था बघुन त्यांना प्रतिभाताई शिंदे यांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. पण दुर्दैवाने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर तासाभरातच त्यांचा मृत्यू झाला. सदर मृत्युला पाचोरा ग्रामीण रुग्णालयच जबाबदार आहे असे रुग्णाचे नातेवाईक सांगतात व ते रास्त देखील वाटते. जर पेशंटला व्हॅटिलेटर किंवा इतर उपचार पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाही तर आवश्यक होता तर सबंधितांकडुन त्यांना आधीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे आणले पाहिजे होते, पण असे न करता फक्त हलगर्जीपणा दिसुन आला.

महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार जर रेमडिसिव्हर इंजेक्शन शासकीय कोविड सेंटर कडुन जर सर्विकडे पुरवठा होत असेल तर ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे का उपलब्ध नाही? अशा प्रश्न उपस्थिती केला जात आहे. बर ते इंजेक्शनचे काही वेळासाठी बाजूला ठेवा पण किमान इतर मेडिसिन तरी रुग्णांना मिळायला हव्या ते देखील खासगी मेडीकल मधून रुग्णांना आणायला लावतात. रुग्णांना जेवण नाही इतकेच काय तर रुग्णांना प्यायला पाणी देखील नाही, टॉयलेट मध्येही पाणी नाही अस्वच्छता आहे. डॉक्टर्स व इतर स्टाफ देखील लक्ष देत नाहीत हि परिस्थिती सदर व्हिडीओ मध्ये दिसत आहे. तरी जलगाव जिल्हात जिल्हाधिकारी अभिजित राऊत व इतर सक्षम अधिकारी यांनी सदर परिस्थितीकडे लक्ष द्यावे व संबंधितांवर योग्य कारवाई करावी जे ने करून इतर पेशंटचा तरी जीव वाचेल. अशी मागणी मृतक कमलाबाई कोळी यांचा नातलगानी केली.