Home latest News अजयपूरची युवा कोरोना वरियर्स योद्धा कु.माधुरी आत्राम

अजयपूरची युवा कोरोना वरियर्स योद्धा कु.माधुरी आत्राम

82

अजयपूरची युवा कोरोना वरियर्स योद्धा कु.माधुरी आत्राम

प्रमाणिक पणे बजावत आहे, आपले कर्त्यव्य.
सर्वीकडुन होत आहे या युवा कोरोना वरियर्सचे कौतुक.

अजयपूरची युवा कोरोना वरियर्स योद्धा कु.माधुरी आत्राम
अजयपूरची युवा कोरोना वरियर्स योद्धा कु.माधुरी आत्राम

✒सौ. हनिशा दुधे, बल्लारपुर तालुका प्रतीनिधी✒
बल्लारपुर,दि.9 एप्रिल:-चंद्रपुर जिल्हातील मूल तालुक्यांतील अजयपुर गावची मुलगी कु. माधुरी आत्राम ही कोरोना वायरसच्या महामारीच्या या गंभीर स्थितीमध्ये कोरोनाशी सामना करत लोकांना जीवदान देत आहे. खरी कोरोना योद्धा म्हणून आपली सामाजिक जबाबदारी योग्यरित्या पाड पाडत आहे.

आज देशात कोरोना वायरस मुळे सर्व लोक भयाखाली जिवन जगत आहे. पण या महामारीत अनेक लोकं आपली सामाजीक जबाबदारी योग्यरित्या पाड पाडत असल्याने जनमानसामधून त्याचे कौतूक होत असते. असेच कौतूक कु.माधुरी आत्राम या युवा कोरोना योद्धाच होत आहे.

अस म्हणतात की, वेळ खराब असली की आपले पण साथ देत नाही. अशा परिस्थितीत कोरोना काळात गंभीर परिस्थितीशी सामना करत ती लढा देत आहे. आपले कर्तव्य पूर्ण करत आहे. स्वतःच्या जीवाचा विचार न करता आपले कर्तव्य पार पाडत आहे. महत्वाची बाब म्हणजे ही आदिवासी समाजाची मुलगी आणि एका ग्रामीण भागातील मुलगी आहे.