Home latest News जिल्हा काँग्रेस रोजगार व स्वयंम रोजगार सेल च्या अध्यक्ष पदी सेवानिवृत्त पोलीस...

जिल्हा काँग्रेस रोजगार व स्वयंम रोजगार सेल च्या अध्यक्ष पदी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार तर कार्याध्यक्ष पदी सेवा निवृत्त तहसीलदार पुष्पलताताई कुमरे यांची निवड !!

73

✒धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली : -महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सुचने नुसार रोजगार व स्वयंम रोजगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष योगेश मसलगे पाटील यांनी गडचिरोली जिल्हा रोजगार व स्वयंम रोजगार सेल च्या जिल्हाध्यक्ष पदी पोलीस विभागात सेवा देऊन निवृत्त झालेले दामदेव मंडलवार यांची नियुक्ती केली. तर कार्याध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार सौ.पुष्पलताताई कुमरे यांची निवड केली आहे.
यावेळी नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दामदेव मंडलवार आणि सौ.पुष्पलताताई कुमरे हे दोघेही सेवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी असल्याने प्रशासन, युवक व रोजगार ह्या विषयावर त्यांचा चांगला अनुभव आहे आणि येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून रोजगार व स्वयंम रोजगार सेल च्या वतीने युवकांच्या रोजगारा संदर्भात अनेक प्रश्न मार्गी लागतील असा मला पूर्ण विश्वास आहे.
यावेळी सोबत शहर काँग्रेस अध्यक्ष सतिश विधाते, काँग्रेस चे जेष्ट नेते तथा जिल्हा महासचिव समशेखान पठाण, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, युवक काँग्रेस प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार, युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी डॉ.प्रणित जांभूळे, युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम, अतुल मल्लेलवार, कुणाल पेंदोरकर, सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.