कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या वर्धापनदिन उत्साहात

कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या वर्धापनदिन उत्साहात

प्रशांत नार्वेकर
अलिबाग प्रतिनिधी
९१५८९९६६६६

अलिबाग:- कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या 67 व्या वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधुन मंडळातर्फे कित्ते भंडारी समाजातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा श्रीबाग येथील कै. गोविंद बाबू नार्वेकर सभागृहात सत्कार करण्यात आला. सुरुवातीला संस्थेचे कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष बळवंत शिर्सेकर यांच्या हस्ते कार्यालयात गणेश पुजन करण्यात आले. तर ज्येष्ठ विश्‍वस्त नरहरी धनाजी तथा तोडणकर गुरुजी यांच्या उपस्थिती मध्ये सुहास मयेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
यावेळी राजनभाई नार्वेकर, वृषाली कचरेकर , प्रफुल्ल मोरे , नंदकुमार मयेकर, उपाध्यक्ष कमळाकर पडवळ, मधुकर पारकर, खजिनदार राम मोरे, सदस्य संतोष मोरे, सुहास मयेकर, प्रथमेश नार्वेकर, तुकाराम शिलधनकर, विजया सनदी लेखापाल संजय राऊत यांच्यासह कार्यकारीणी सदस्य यशवंत राऊत, राजेंद्र बांदीवडेकर, दत्तात्रय म्हात्रे, सचिन खेऊर, बाबा मोहिते , दर्शन पारकर, हरिश्चंद्र शिरधनकर , आदिक नार्वेकर , दत्तदास मयेकर, प्रफुल्ल नागवेकर, दिनेश बिर्जे आदी उपस्थित होते. यावेळी विश्‍वस्त नरहरी धनाजी तथा तोडणकर गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्ष बळवंत शिर्सेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर सनदी लेखापाल संजय राऊत यांनी भविष्यातील वाटचालीचा आढावा घेतला.सूत्रसंचलन सुशील विलणकर यांनी केले.