श्रीवर्धन काहींची मालमत्ता नाही; निर्णय जनता घेणार – मंत्री भरतशेठ गोगावले

36

श्रीवर्धन काहींची मालमत्ता नाही; निर्णय जनता घेणार – मंत्री भरतशेठ गोगावले

निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123

श्रीवर्धन तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर आणि माजी महिला व बालकल्याण सभापती अक्षदा कोळंबेकर यांनी समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. रानवली येथे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले.

या वेळी मंत्री गोगावले म्हणाले, “श्रीवर्धन काहींची वैयक्तिक मालमत्ता नाही; निर्णय जनता घेणार आहे. आम्ही कधी खोटं बोललो नाही, गरीबांचा आशीर्वाद हेच आमचं बळ आहे.” त्यांनी महात्मा फुले आरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्याची आणि रोजगार हमी योजनेंतर्गत २६४ प्रकल्प सुरू करण्याची घोषणाही केली.

बॉक्साईट संदर्भात इशारा देत गोगावले म्हणाले, “ते चांगल्या रीतीने वागले तर ठीक, नाहीतर त्यांचा जय हरी करायला वेळ लागणार नाही.”
या पक्षप्रवेशामुळे श्रीवर्धन तालुक्यात शिंदे गटात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठी नवे राजकीय समीकरण तयार होत असल्याचे चित्र आहे.