Home latest News माजी सैनिक बळीराम गिते यांना वंदे मातरम् प्रतिमा भेट देऊन सन्मान..

माजी सैनिक बळीराम गिते यांना वंदे मातरम् प्रतिमा भेट देऊन सन्मान..

125

माजी सैनिक बळीराम गिते यांना वंदे मातरम् प्रतिमा भेट देऊन सन्मान..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हसळा संघटनेचे कौतुकास्पद उपक्रम

म्हसळा: संतोष उध्दरकर.

म्हसळा: वंदे मातरम् गिताला १५० वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण महाराष्ट्रात भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन शताब्दी महोत्सव साजरा करीत असतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हसळा संघटनेच्या वतीने ज्या भारत मातेच्या रक्षणासाठी सिमेवर भारत मातेच्या जवानांनी बलीदान दिले, भारत मातेचे रक्षण केले त्या भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक बळीराम गिते यांना वंदे मातरम् गित १५० वर्षपुर्ती निमित्ताने वंदे मातरम प्रतिमा भेट देऊन शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, या अनोख्या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे, हा सन्मान भारत मातेच्या सुपुत्राचा आहे, भारतीय सैन्य दलात २२ वर्ष ज्यांनी सेवा केली त्या माजी सैनिकाचा आहे असे युवा सेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे यांनी सांगीतले, तसेच ज्यांच्या मुळे हा देश सुजलाम.. सुफलाम आहे त्या प्रत्येक शुर विरांना आमचा सलाम. एक माजी सैनिक म्हणून वंदे मातरम् प्रतिमा भेट देऊन माझा सन्मान केलात त्या बद्दल गिते यांनी आभार व्यक्त केले.या वेळी म्हसळा शहर प्रमुख अभय कलमकर, युवा तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, अल्पसंख्याक उप जिल्हा अध्यक्ष शौकत हाजवाने,उप शहर प्रमुख नौवमन वजगरे,उप शहर अधिकारी अंकुश नटे,फहद पठाण,आदि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.