अवैधरित्या गायी कोंबून नेत असताना पोलिसांची कारवाई, 9 गोधनास जीवदान

वाहन चालक पसार बोरगाव मंजू पोलिसांची कारवाई

सिद्धार्थ पाटील प्रतीनिधी

अकोला/ बोरगाव मंजू:-  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हैसाग मार्गावर अवैधरित्या वाहनातून कोंबून नऊ गोधन वाहुन नेत असताना पोलिसांनी सदर वाहना सह सात गायी व दोन गोऱ्हे पकडून तीन लाख विस हजार रुपयाचा ऐवज जप्त केला,ही कारवाई मंगळवारी सकाळी दरम्यान केली,


पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार म्हैसाग नजीक एका शेता नजीक एका बोलोरो मालवाहू गाडीतून निर्दयतेने कोंबून सात गायी व दोन गोऱ्हे निर्दयतेने कोंबून बांधून वाहतूक होत असल्याची खबर ठाणेदार सुनील सोळंके यांना मिळाली दरम्यान जनावरांना लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव झाल्यानें जनावरांच्या वाहतूकीसाठी प्रशासनाने निर्बंध घातले आहे, या पार्श्वभूमीवर ठाणेदार सुनील सोळंके यांनी दखल घेऊन, रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱी संचेद्र पंचवटकर, संदिप राऊत,राजु चव्हाण, यांनी घटनास्थळी धाव घेऊन बोलोरो मालवाहू गाडी क्रमांक एम एच बीडी ५७६५ सह नऊ गोधन , किंमत गाडी सह तीन लाख विस हजार रुपये ऐवज जप्त केला, दरम्यान घटनास्थळावरून चालका सह अन्य काही पसार झाले दरम्यान संगोपनासाठी साठी आदर्श गोसेवा केंद्रात दाखल करण्यात आले पुढील तपास पोलीस करत आहेत, दरम्यान घटनेची फिर्याद वरुन प्राणि स्वरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here