Home latest News कळमेश्वरात शेतकरी आंदोलनाच्या भारत बंदला अल्पप्रतिसाद..

कळमेश्वरात शेतकरी आंदोलनाच्या भारत बंदला अल्पप्रतिसाद..

93

कळमेश्वरात शेतकरी आंदोलनाच्या भारत बंदला अल्पप्रतिसाद..

युवराज मेश्राम प्रतीनिधी

कळमेश्वर:- आज कळमेश्वर येथे विरोधी पक्षाचे वतीने भारत बंद चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, दलित वंचित आघाडी, आदींचा समावेश होता. आज सकाळ पासुन काही वेळ पर्यंत कळमेश्वरातील बाजारपेठ बंद होती. परंतु लगेच बाजारपेठ सुरळीतपणे सुरू झाली. शासकीय कार्यालयासहीत, बँकेचे कामकाज सुरु होते. विविध पक्षाचे वतीने निषेध मार्च काढून बंद चे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर हा मार्च तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार सचिन यादव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पालिकेच्या उपाध्यक्ष जोस्तना मंडपे, माजी नगराध्यक्ष फत्तेसिंग मरडवार, नीलकंठ भोसकर, सरजू मंडपे, प्रशांत इखार, प्रमोद बागडे, ललित देशमुख, वनिता भलावी,पंकज कुरळकर, अनिल बोडखे, माणिकराव चांदूरकर, सुरेश लंगडे, बबन वानखेडे आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, दलित वंचित आघाडी च्या असंख्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्याचा समावेश होता.