Home latest News पं. स. ब्रम्हपुरी अंतर्गत दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला.

पं. स. ब्रम्हपुरी अंतर्गत दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला.

79

पं. स. ब्रम्हपुरी अंतर्गत दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला.

 

पं. स. ब्रम्हपुरी अंतर्गत दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला.
पं. स. ब्रम्हपुरी अंतर्गत दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला.

राहुल भोयर ब्रम्हपुरी प्रतिनिधी मो 9421815114

ब्रम्हपुरी : -आज दिनांक 07/12/2021 ला ने. हि. विद्या. ब्रम्हपुरी येथे 03 डिसें. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आ. श्री.रणदिवे सर मु.अतिथी, तर प्रमुख पाहुणे म्हणून आद.श्री. खुणे साहेब गटशिक्षाधिकारी प. स. ब्रम्हपुरी हे उपस्थित होते. तसेच डॉ. सौ. शेळके मॅडम शि. वि. अ. प. स. ब्रम्हपुरी , श्री. नरेश रामटेके सर, श्री.धनपाल शेंडे, कु. डोरलिकर मॅडम, श्री. झोडपे, श्री. मोरघडे श्री ठाकरे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागताने करण्यात आली. नंतर शाळेतील विशेष गरजा असलेल्या मुलाचे पुष्प देऊन स्वागत करून मुलांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवराच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची रूपरेषा, प्रस्तावना तसेच समता व बंधुता, समान संधी, विविध दिव्यांगाचे कायदे व त्याचे या मुलांना होणारे फायदे, या सप्ताहाचे महत्व, समावेशन, शिक्षण व विशेष प्रशिक्षण यावर प्रकाश श्री. धनपाल शेंडे विषेश तज्ज्ञ गट साधन केंद्र, ब्रम्हपुरी यांनी केले. श्री.नरेश रामटेके सर RP. यांनी संविधानामध्ये नमुद समता, समानता, वैचारिक भेद व दिव्यांगचे समावेशन यावर प्रकाश टाकला. कु. डोरलिकर मॅडम यांनी या सप्ताह निमित्त मार्गदर्शन केले, डॉ. सौ. शेळके मॅडम शि. वि. अ. प. स. ब्रम्हपुरी यांनी दिव्यांगावर मार्गदर्शन केले. श्री. रणदिवे सर मु. अ. यांनी अध्यक्षीय भाषणात मुलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन श्री. नाईक सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. गायकवाड सर यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. तसेच गसाके,ब्रम्हपुरी मधील कर्मचाऱ्याचे सहकार्य लाभले.