She went to the police to lodge a complaint against her husband. And the police went wild ..
She went to the police to lodge a complaint against her husband. And the police went wild ..

पती विरोधात पोलीसांत तक्रार दयायला गेली. आणि पोलिसच निघाला हैवान..

She went to the police to lodge a complaint against her husband. And the police went wild ..

✒औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी✒
अलवार, दि.9मार्च:- राजस्थान येथील अलवार भागात एका पोलिसांनी महिलेवर सलग तीन दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला 26 वर्षाची असून ती पोलीस ठाण्यात तीच्या पतीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती. त्यानंतर एका 56 वर्षाच्या पोलिस उपनिरीक्षकाने तीला आपल्या जाळ्यात अडकवून तिच्या बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्राप्त माहिती नुसार अलवर जिल्हातील खेडली पोलिस स्टेशन क्षेत्रात पोलिस उप निरीक्षक भरत सिंग यांनी केलेल्या बलात्काराची माहिती मीळताच आईजी हवा सिंग घुमारीया, पोलिस अधीक्षक एसपी तेजश्वीनी गौतम घटना स्थळी पोहचल्या आणि महिलेचा बयान नोंद करुन घेतला.

पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह यांनी मला पतीसोबत साम्यंजस्याने तोडगा काढू असं सांगत मला जाळ्यात ओढलं आणि 3 दिवस माझ्यावर बलात्कार केला. 54 वर्षीय पोलीस उपनिरीक्षक भरत सिंहने 26 वर्षीय तक्रारदार महिलेला पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या त्याच्या कार्यालयात आणि घरी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला, असं महिलेने सांगितलं आहे.

महिलेला 7 मार्च रोजी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं तेव्हा तिने विरोध केला. दुपारनंतर जेव्हा ती महिला पोलीस ठाण्यात पोहोचली तेव्हा तिने पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करत तक्रार दिली. दरम्यान, पोलीस महासंचालक हवासिंह घुमरिया यांनी प्राथमिक चौकशीत भरत सिंह दोषी अढळ्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here