Home latest News वडापाव देण्याचे आमिष देऊन 7 वर्षीय चिमूकलीवर बलात्कार करणारा नराधमांस 20 वर्षाची...

वडापाव देण्याचे आमिष देऊन 7 वर्षीय चिमूकलीवर बलात्कार करणारा नराधमांस 20 वर्षाची शिक्षा.

87

वडापाव देण्याचे आमिष देऊन 7 वर्षीय चिमूकलीवर बलात्कार करणारा नराधमांस 20 वर्षाची शिक्षा.

औरंगाबाद विशेष जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वाचा निकाल.

 Man sentenced to 20 years for raping 7-year-old Chimukali
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी✒

औरंगाबाद,दि.9मार्च:- वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवून सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी विविध कलमांखाली 20 वर्षे सक्तमजुरी व 89 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी 20 हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिले.

31 जुलै 2018 रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पीडितेच्या आईने आरोपी बंडू रोहिदास राठोड विरोधात तक्रार दाखल केली होती. बंडूने 30 जुलै 2018 रोजी सात वर्षीय मुलीला वडापाव खाण्यासाठी तिच्या आईला विचारून नेले. मात्र बराच वेळ झाला तरी हे दोघे परतले नाहीत. त्यामुळे आईने तिचा शाोधही घेतला. दुसरा दिवस उजाडला तरी ते आले नाहीत. मात्र बंडू ओळखीचा असल्याने तो आज मुलीला आणून सोडेल, या आशेने आई मयूर पार्क येथे कामाला गेली.

दरम्यान, बंडूने पीडितेला गिरनार तांडा भागात नेऊन पोटात, डोक्यात मारहाण करून अत्याचार केले. त्यानंनंतर तो तिला तेथेच सोडून निघून गेला. रात्रभर ती एका शेतात थांबली. सकाळी एका म्हशीपालकाने तिला पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली, अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी बंडूला अटक केली. त्यानंतर न्यायालयात 10 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. यामध्ये पीडिता, फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शीचे जबाब महत्त्वाचे ठरले.