भाजपचा जुना निर्णय पुन्हा लागू होणार; सरपंच थेट जनतेतून निवडून येणार !

भाजपचा जुना निर्णय पुन्हा लागू होणार; सरपंच थेट जनतेतून निवडून येणार !

भाजपचा जुना निर्णय पुन्हा लागू होणार; सरपंच थेट जनतेतून निवडून येणार !

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

मुंबई : भाजपने सत्तेत असताना लागू केलेला निर्णय परत लागू करण्याची शक्यता आहे. भाजपने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असा निर्णय घेतला होता. हा निर्णय लागू असताना काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. पण २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर सरकारकडून हा निर्णय स्थगित करण्यात आला होता. परत आता भाजप सत्तेत आल्यामुळे हा निर्णय लागू केला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.भाजप शिंदे युती सरकारने हा निर्णय घेतल्यावर राज्यातील १० हजार ग्रामपंचायतीतील सरपंच हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्याचबरोबर नगरपालिकेतील नगराध्यक्षही थेट जनतेतून निवडला जाणार असून हा निर्णय येत्या हिवाळी अधिवेशात सरकारकडून घेण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान हा निर्णय पुन्हा लागू करावा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.भाजपने २०१४ साली सत्तेत आल्यानंतर ग्रामपंचायतीतील सरपंच आणि नगरपालिकेतील नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर २०१९ ला तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारने आणि अजित पवारांच्या पुढाकाराने हा निर्णय स्थगित केला होता. पण आता शिंदे यांना सोबत घेऊन भाजप परत सत्तेत आल्यामुळे हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे.सरपंच किंवा नगराध्यक्ष निवडून आलेल्या सदस्यामधून निवडला गेल्यास भ्रष्टाचाराला वाव असतो. आणि स्थानिक स्वराज्य संस्था अस्थिर बनतात. त्यामुळे बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारकडे परत हा निर्णय लागू करण्याची मागणी केली आहे. या निर्णयानंतर राज्यातील १० हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायती आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येण्याची शक्यता आहे.