तहसिल कार्यालय पंचायत समिती मुख्य मार्गावर ,खड्डेच खड्डे मात्र प्रशासन सुस्त
✍राजेंद्र मेश्राम✍
गोंदिया शहर प्रतिनिधी
94205 13193
गोंदिया : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की गोंदिया शहरातील मुख्य मार्गावरील आंबेडकर चौकातून जाणाऱ्या तहसिल कार्यालय आणि पंचायत समिती च्या मुख्य मार्गावर ,जागो जागी खड्डे, पडून पाणी, साचुन ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि कधीही दुर्घटना घडू शकते.परंतु गोदिया मुख्य चौकात, ये जा करण्यारया ना त्रास सहन करावा लागतो, असूनही पायदळ, चार चाकी, मोटर सायकल यांना मार्ग शोधून चालावं लागतं आहे .पण या खडया मुळे कधी दुर्घटना घडू शकते याला नाकारता येत नाही. परंतु प्रशासन या कडे दुर्लक्ष न करता वेळेवर लक्ष दिले तर मार्ग मोकळा होऊ शकतो व पुढे होणाऱ्या अपघात टाळू शकतो व जीवित होणाऱ्या घटनांना रोकू शकतो .