आरसीएफची अनुसूचित जाती-जमाती नोकर भरती प्रक्रिया पुन्हा सुरू.

आरसीएफची अनुसूचित जाती-जमाती नोकर भरती प्रक्रिया पुन्हा सुरू.

अँड.प्रविण ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश.

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) द्वारे अनुसूचित जाती (एससी ) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील उमेदवारांसाठी जाहीर करण्यात आलेली नोकर भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आलेली भरती प्रक्रीया आरसीएफने स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात देवून पुन्हा सुरू केली आहे. दि. 9 जूलै 2025 ते दि. 25 जूलै 2025 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहेत. “अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पदांसाठी विशेष भरती मोहीम – अनुसूचित जाती – 15 पदे, अनुसूचित जमाती – 26 पदे आणि इतर मागासवर्गीय (एनसीएल) – 33 पदे“ अशा एकूण 74 पदांसाठी ही भरती आहे. काही दिवसांपूर्वी भरती रद्द करण्याच्या आरसीएफच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्यामुळे महाराष्ट् र्प्रदेश कॉंग्रेस सेक्रेटरी अॅड.प्रविण ठाकूर यांनी आरसीएफचे सीमडी यांना ईमेल करून रद्द केलेली भरती प्रक्रीया तात्काळ पुन्हा घेण्याची मागणी केली होती.
अॅड. ठाकूर यांनी आपल्या पत्रात त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरसीएफने काही महिन्यांपूर्वी विविध पदांसाठी एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता विशेष भरती मोहीम जाहीर केली होती. हजारो विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी अर्ज केले होते. अनेकांनी परीक्षेची तयारी करण्यासाठी मोठा वेळ आणि पैसा खर्च केला होता. काही उमेदवारांनी तर खासगी नोक-़्या सोडून या भरती प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र, 19 जून रोजी आरसीएफने स्थानिक वर्तमानपत्रात व त्यांच्या वेबसाईटवर एक अधिकृत सूचना जारी करत ही भरती प्रक्रिया “अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव“ रद्द करत असल्याचे जाहीर केले. या निर्णयामागे नेमकी कोणती प्रशासकीय कारणे आहेत, याबाबत आरसीएफने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि तीव्र नाराजी पसरली होती.
सामाजिक संघटनांनी आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी व अखील भारतीय कॉंग्रेस पक्षाने आरसीएफच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला होता. त्यांनी आरसीएफला लवकरात लवकर या भरती प्रक्रियेबाबत पुनर्विचार करण्याची किंवा रद्द करण्यामागे नेमकी काय कारणे आहेत, हे स्पष्ट करण्याची मागणी केली होती..या प्रकारामुळे सरकारी आणि निमसरकारी संस्थांमधील भरती प्रक्रियांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हजारो आशाळभूत विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी ठेवणा-्या या निर्णयावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. आरसीएफने लवकरात लवकर या भरती प्रक्रियेबाबत पुनर्विचार करावा व या भरतीसाठी अर्ज भरणा-या विदयार्थ्याना न्याय दयावा अशी मागणी अॅड.प्रविण मधुकर ठाकूर यांनी केली होती.आता भरती प्रक्रीया पुन्हा सुरू झाल्याने विदयार्थ्यांनी समाधान व्यक्त करून अॅड.प्रविण मधुकर ठाकूर यांचे आभार मानले आहे.