राष्ट्रवादीचे नेते अभिजीत फाळके पाटील यांना वर्धिनी महिलांकडून मागणीचे निवेदन.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
वर्धा, दिनांक 09 ऑगष्ट :- महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या वर्धिनी महिलांना नियमित नियमित काम मिळावे यासाठी स्थानिक विश्रामगृह वर्धा येथे राष्ट्रवादीचे नेते अभिजीत फाळके पाटील यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले.
सदर प्रकरण असे की वर्धिनी महिला या महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक गुणवत्ता वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील गावागावात जावून महिला बचत गट तयार करण्याचे काम मागील 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत काम करतात. यांना फक्त तीन ते चार महिनेच काम दिले जातात. परंतु कोरोना काळात या कुटुंबांना फार मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. हाताला काम नसल्यामुळे अनेक कुटुंब कर्जबाजारी झाली आहेत याकरिता या वर्धिनी महिलांना १२ महीने नियमित काम मिळावे व न्याय देण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती. या प्रकारणाची दखल घेत राष्ट्रवादीचे नेते अभिजीत फाळके पाटील यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात असल्याचे आश्वासन दिले. निवेदना प्रसंगी श्री.सुरेश गोसावी (आयटक सह सचिव) तसेच वर्धिनी महिला रत्ना भेंडे, रजनी येवतकर, साधना सरदार, सुकेशिनी जुनघरे, सविता बनकर, सुनंदा भगत, जया नागोसे, आशा धडित इत्यादि महिला उपस्थित होत्या.