बल्लारपूरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 9 ऑक्टोंबर
बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथील बुकिंग ऑफिस जवळ एक अनोळखी पुरुष मृत अवस्थेत आढळून आला. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत व्यक्तीचे वय 60 वर्ष असून, उंची 5 फुट 2 इंच, सडपातळ बांधा, केस टक्कल पडले आहे. सभोवतालचे केस पांढरे वाढलेले, चेहरा लांबट, रंग निमगोरा, नाक सरळ लांबट, मिशी वाढलेली काळी पांढरी, उजव्या हातावर काळ्या रंगाचा रबर घातलेला आहे तसेच अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व गर्द निळ्या रंगाचा लोअर फुलपॅन्ट परीधान केला आहे.