नववीच्या विद्यार्थिनीवर 13 दिवसात 8 जणांकडून बलात्कार
पीडिता 20 नोव्हेंबर रोजी घरी न सांगता मैत्रिणीला भेटायला अम्बिकापुर येथे गेली होती. तिथे तिची भेट एका तरुणाशी झाली आणि ती त्याच्यासोबत निघून गेली. या तरुणाने तिच्यावर काही दिवस बलात्कार केला आणि तिला त्याच्या मित्रांकडे सोपवलं. त्यानंतर 13 दिवस तिच्यावर 8 जणांनी सतत बलात्कार केले.
छत्तीसगढ:- मधील बलरामपुर येथे एका नववीच्या विद्यार्थिनीवर 13 दिवसात 8 जणांकडून बलात्कार झाल्याची भयंकर घटना घडली आहे. गंभीर म्हणजे या आरोपींमधील सहा जण अल्पवयीन आहेत.
ही घटना छत्तीसगढमधील बलरामपुर येथे घडली आहे. येथील राजपुर गावात राहणारी पीडिता 20 नोव्हेंबर रोजी घरी न सांगता मैत्रिणीला भेटायला अम्बिकापुर येथे गेली होती. तिथे तिची भेट एका तरुणाशी झाली आणि ती त्याच्यासोबत निघून गेली. या तरुणाने तिच्यावर काही दिवस बलात्कार केला आणि तिला त्याच्या मित्रांकडे सोपवलं. त्यानंतर 13 दिवस तिच्यावर 8 जणांनी सतत बलात्कार केले.
आपल्यावर सातत्याने होत असलेल्या दुष्कृत्यामुळे पीडितेला जबर धक्का पोहोचला. दरम्यान, इथे ती बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. जवळपासच्या नातेवाईकांकडे ती न सापडल्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तिथे अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपास करून पीडितेला शोधून काढलं आणि तिचा जबाब नोंदवला. तिने दिलेला जबाब ऐकून पोलीसही हादरले. पोलिसांनी या 8 जणांविरुद्ध तक्रार नोंदवून घेतली आणि त्यांचा शोध सुरू करत आठही आरोपींना बेड्या ठोकल्या. यातील 6 जण अल्पवयीन असून दोन सज्ञान आहेत. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. न्यायालयाने या दोन सज्ञान आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांची रवानगी सुधारगृहात केली आहे.