Home latest News 11वी च्या विद्यार्थीनीला जबरदस्तीने दारू पाजून गुंडांनी केला गँगरेप.

11वी च्या विद्यार्थीनीला जबरदस्तीने दारू पाजून गुंडांनी केला गँगरेप.

88

11वी च्या विद्यार्थीनीला जबरदस्तीने दारू पाजून गुंडांनी केला गँगरेप.

झांसी :- उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये अकरावीच्या विद्यार्थीनीवर गँगरेप झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, शेजारी राहणार्‍या चार गुन्हेगारांनी विद्यार्थीनीला जबरदस्तीने दारू पाजून आपल्या साथीदारांसह तिच्यावर गँगरेप केला. घटना झांसी जिल्ह्यातील मऊरानीपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. परीक्षा देण्यासाठी गेलेली ही विद्यार्थीनी बेशुद्ध आवस्थेत ऑटो रिक्षात सापडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षांची मुलगी इंटरमिजिएटमध्ये 11वी ची विद्यार्थीनी आहे. तिच्या कुटुंबियांच्या माहितीनुसार सोमवारी ती परीक्षा देण्यासाठी बसने मऊरानीपुर येथे गेली होती. या दरम्यान बसमध्ये एका व्यक्तीने तिला नशेचा पदार्थ खाऊ घातला. दुपारी मऊरानीपुरच्या काव्या हॉटेलजवळ ती एका टेम्पो (थ्री व्हीलर) मध्ये बेशुद्ध आवस्थेत मिळून आली. घटनास्थळी पोहचलेल्या कुटुंबियांनी विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याची शंका व्यक्त केली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि पीडितेला तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी घेऊन गेले.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) दिनेश कुमार यांनी म्हटले की, पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार विद्यार्थीनीवर गँगरेप झाला असावा असे वाटत नाही, यासाठी पीडितेच्या मेडिकल रिपोर्टची प्रतिक्षा केली जात आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.