Home latest News महिला प्रत्येक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम- डॉ मंगेश गुलवाडे

महिला प्रत्येक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम- डॉ मंगेश गुलवाडे

83

महिला प्रत्येक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम- डॉ मंगेश गुलवाडे

हेल्पिग हँड बल्लारपूर हिरकणी संस्थे द्वारा आयोजित महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

Women able to represent every field- Dr. Mangesh Gulwade

सौ.हनिशा दुधे
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी 

बल्लारपूर:- चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात हेल्पिग हँड या संस्थे द्वारे महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे बक्षीस वितरण कार्यक्रम रविवार दिनांक ७ मार्च ला भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते, त्यांनी सांगितले की भारतातील महिला ह्या विविध क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम असून त्यांनी आज उच्च पद भूषविली आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, भारताच्या राष्ट्रपती पदापासून तर डॉक्टर, वकील, खेडाळू अशा विविध क्षेत्रात नाव उंचावण्याचे काम भारतातील महिलांनी केले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी प्रथम व द्वितीय विजेच्या संघाला बक्षीस देण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रमाला डॉ.मंजुषा कल्लूरवार हेल्पिग हँड अध्यक्षा, विजय सरनाईक मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, संगीता पांडे, ऍड. मेघा रामगुंडे, स्नेहा भाटिया, सचिव संजना मूलचंदानी, हर्षिता कुकरेजा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.