हिंगणघाट ते नंदोरी रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहू रस्त्याच्या कडेला उलटली..

✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078
हिंगणघाट : शहरापासून सुमारे १ कि. मी. अंतरावर असलेल्या हिंगणघाट ते नंदोरी रोडवरील महाकाली नगरी लगतच एक मालवाहू रस्त्याच्या कडेला उलटला.
हिंगणघाट येथून एम. एच. ४०- ६८८९ क्रमांकाचा मालवाहू फळविक्रि करणाऱ्या लोकांना घेऊन फळविक्रिसाठी टेमुरडा येथे जात असताना हिंगणघाट येथुन सुमारे १ किमी अंतरावर असलेल्या महाकाली नगरी जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी अनियंत्रित होउन रस्त्याच्या कडेला जाउन उलटी, रस्त्याने जाणारे- येणाऱ्या नागरिकांनी त्वरीत बाहेर काढून रुग्णवाहिकेला पाचारण केले असता काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे हलविण्यात आले. व सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.








