” ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे आज जिल्हा परिषद भंडारा येथे ठिय्या आंदोलन ” ” ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे नवीन किमान वेतन मंजूर करावे, विशेष भत्ता शासनाने शंभर टक्के पूर्ण करावे ” ” पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी विविध योजनांचे निवेदन देणार “

” ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे आज जिल्हा परिषद भंडारा येथे ठिय्या आंदोलन “

” ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे नवीन किमान वेतन मंजूर करावे, विशेष भत्ता शासनाने शंभर टक्के पूर्ण करावे “

” पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी विविध योजनांचे निवेदन देणार “

" ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे आज जिल्हा परिषद भंडारा येथे ठिय्या आंदोलन " " ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे नवीन किमान वेतन मंजूर करावे, विशेष भत्ता शासनाने शंभर टक्के पूर्ण करावे " " पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी विविध योजनांचे निवेदन देणार "

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞

भंडारा :- सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक १० मार्च २०२२ रोज गुरुवार ला आयटकप्रणित महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी आज भंडारा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, मोहाडी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या संघटनेच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला होता, सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मा.श्री. माधोराव बांते कॉम. हे होते, यावेळी कार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर, तालुका सचिव जयप्रकाश मेहर, जिल्हा कोषाध्यक्ष गजानन लाईसे उपस्थित होते,
वारंवार आंदोलन करुन प्रश्न सुटले नाहीत, त्यामुळे संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन महासंघाने केले आहे, त्या अनुषंगाने १० मार्च रोजी जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचे काम सुरू केले आहेत,ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना नवीन किमान वेतन लागू करावे, विशेष भत्यासाठी शासनाने शंभर टक्के अनुदान द्यावे , भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा न करणाऱ्या विरुद्ध फोजदारी कार्यवाही करावी, पेन्शन योजना लागू करावी आदी विविध मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.