Home latest News रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ.
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९३
अलिबाग:- रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित एकोणीस वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला काल रायगड जिल्ह्यातील विविध भागातील क्रिकेट मैदानावर सुरुवात करण्यात आली.घरत क्रिकेट मैदान खारघर येथे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश पाटील यांच्या शुभहस्ते स्पर्धेला शुभारंभ करण्यात आला. एसबीसी महाड विरुद्ध चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर ह्या दोन संघाने मध्ये उद्घाटनीय सामना खेळविण्यात आला.तसेच रायगड जिल्ह्यातील बी.पी पाटील क्रिकेट मैदान खारघर,घरत क्रिकेट मैदान,फोर्टी प्लस गावदेवी क्रिकेट मैदान टेंभोटे पनवेल,छत्रपती शिवाजी महाराज मैदान उलवे,छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्रीडांगण पेण अशा जिल्ह्यातील विविध मैदान ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.रायगड जिल्ह्यातील नामवंत क्रिकेट अकॅडमी/क्लब संघानी ह्यामध्ये सहभाग घेतला आहे.स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद फेरीनुसार होणार असून स्पर्धेतील खेळाडूंनी केलेल्या कामगिरीवर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ निवडला जाणार आहे.निवड झालेला संघ पुढे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल.रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदीप नाईक यांच्या सह आरडीसीएचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.