Home latest News मराठवाड्यातील ६०० हेक्टर सिंचन क्षमता असणारा दिवशी प्रकल्प

मराठवाड्यातील ६०० हेक्टर सिंचन क्षमता असणारा दिवशी प्रकल्प

89

 या तलावामुळे दिवशीकानी व पाकी या गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी होणार पाण्याचा पुरवठा

मराठवाड्यातील ६०० हेक्टर सिंचन क्षमता असणारा दिवशी प्रकल्प

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

१२ फेब्रुवारी, नांदेड: नांदेड जिल्ह्यातील दिवशी (बु.) (भोकर) प्रकल्पास 37 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. हा सिंचन तलाव मराठवाड्यातील 251 ते 600 हेक्टर सिंचन क्षमता असणारा मृद व जलसंधारण विभागाचा पहिलाच प्रकल्प असून या सिंचन तलावाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

जलसंधारण मंत्री श्री. गडाख म्हणाले, दिवशी (बु.) सिंचन तलावाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसह निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यादेश देण्यात आले आहेत. या तलावाचे काम तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हे आपण वाचलंत का?

हा प्रकल्प दिवशी परिसरासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या तलावामुळे दिवशी, कानी व पाकी या गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या सिंचन तलावासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा पाठपुरावा होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यातील सिंचनाच्या अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जलसंधारण मंत्री श्री.गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली दिवशी सिंचन तलावासारख्या अधिक सिंचन क्षमतेच्या तलावास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात येत असून याद्वारे राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.