Home latest News चिंचोटी गावामध्ये जल जीवन योजनेत घोटाळा,

चिंचोटी गावामध्ये जल जीवन योजनेत घोटाळा,

132

चिंचोटी गावामध्ये जल जीवन योजनेत घोटाळा,

कालावधी पूर्ण होऊन ही प्यायला पाणी नाही,

अँड,राकेश पाटील यांची पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटीच्या माध्यमातुन चिंचोटी गावामध्ये जलजीवन मिशन योजना कालावधी उलटुनही योजना पुर्ण केली नसून सदरच्या योजनेमध्ये सरकारी निधीचा लाखो रूपयांचा अपहार / भ्रश्टाचार केला असून या योजनेशी संबधित असणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच बिंदिता बाबुराव पाटील, तसेच कंत्राटदार झाद इंटरप्रायझेस, ग्रामसेवक पि.डी. दिवकर, कार्यकारी अभियंता श्री. वेगुर्लेकर, उपविभाग अभियंता निहाल चवरकर या लोकसेवकांच्या विरूध्द् भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 318, 198, 199, 201 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करणेबाबतचा तक्रार अँड राकेश पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हाधिकारी, रा. जि, परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भारत बास्टेवाड, लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक, यांच्याकडे तक्रार केली आहे

या मध्ये ,चिंचोटी गावामध्ये ग्रामपंचायत चिंचोटीच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजना सन 2021-2022 मध्ये राबविण्यात आली. सदरच्या योजनेचे काम करण्यासाठी रक्कम रूपये 1,98,58,100/- रूपयांचा निधी लोक वर्गणीतुन उभा करण्यात आला. या निधी पैकी चिंचोटी गावाच्या नळ पाणी योजणेकरीता 76,16,345/- रूपयांच्या निधीची तरतुद शासनाने केली होती व आहे.

सदर योजनेस ग्रामसभेमध्ये मंजूरी देण्यात आली आहे. सदरच्या योजनेसाठी तांत्रिक मान्यता दिनांक 28/11/2022 रोजी देण्यात आली. तसेच काम पूर्ण होण्याच्या दिनांक 27/11/2023 हा होता. सदरच्या कामाची अमंल बजावणी यंत्रणा जल जीवन पुरवठा जिल्हा परिषद रायगड यांची होती.

सदरची जल जीवन योजना राबविण्याची महत्वाची जबाबदारी ही ग्रामपंचायत सरपंच बिंदिता बाबूराव पाटील , ग्रामसेवक पि.डी.दिवकर , कार्यकारी अभियंता वेगुर्लेकर, उपविभाग अभियंता निहाल चवरकर या लोकसेवकांवर होती. सदरच्या योजनेचा ठेका / कंत्राट हे झाद इंटरप्रायझेस यांना देण्यात आला होता.

सदरच्या योजनेच्या बाबतीत चिंचोटी गावामध्ये कंत्राटदार झाद इंटरप्रायझेस यांनी गावातील काही आळयामध्ये पाईप लाईन टाकली तर काही आळयांमध्ये अजून पर्यंत पाईप लाईनच पोहचलेली नाही. तर काही ठिकाणी या याजनेचे पाईप उघडयावर सोडले आहेत.

सदरच्या कंत्राटदाराच्या वतीने सह कंत्राटदार म्हणून काम करणारे गावातील काही कंत्राटदारांनी पाईपवरून नळ कनेक्षन जोडण्यासाठी गावातील जनते कडून प्रत्येक नळ कनेक्शन मागे रक्कम रूपये 250/-रूपये वसुल केले आहेत. हे सत्य आहे. सदरचे 250/- रुपये घेण्याचा ठेकेदाराला कोणताही अधिकार नसताना बेकायदेशीर पणे लोकांकडून एकप्रकारे पाणी न देताच लुट केली आहे. त्या पैसे घेणाऱ्या विरूध्द् गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.
नळ योजनेसाठी पाण्याची टाकी उभी करण्यात आली असून पाण्यासाठीची विहीरही बांधण्यात आली आहे. तसेच केबीनही बांधण्यात आली असून सदरचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची स्थानिक नागरीकांमध्ये चर्चा आहे.
पिण्याचे पाणी ही माणसांची मुलभुत गरज आहे. माणूस त्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. चिंचोटी गावातील महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेूवन पाणी भरावे लागते. जनता पाण्याकरीता शासनाने राबविलेल्या योजनेप्रमाणे व ग्रामपंचायतीने पाण्याच्या मागितलेल्या वर्गणी प्रमाणे भाबडेपणे वर्गणी पाण्याकरीता जमा करत असतात. परंतु सदरच्या पैशाचा काय उपयोग केला जातो? याबाबत कधीही जनतेस कळत नाही. पाणी आज येईल या आशेवर दिवस ढकलत आहेत.

सदर योजनेत जनतेचा पैसा केवळ कागदोपत्री वापरलेला दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात त्या योजनेची कोणतीही अमंजलबजावणी कुठे ही झालेली नाही. याकरीता ग्रामपंचायत हेच दोषी आहेत. कारण प्रत्यक्षात अशी कोणतीही योजना न राबवता त्याची खोटी बिले काढुन पैसे लाटलेले आहेत.

शासन सदर योजना या ज्या गावांत पाणी टंचाई आहे. त्या ठिकाणी जनतेला पाणी पोहचविणे परंतु जनतेस पाण्यापासून वंचित ठेऊन शासकीय अधिकारी जनतेचे सेवक, ग्रामपंचायत या योजनेचा लाभ जनतेपर्यंत न पोचवता खोटी बिले न झालेल्या कामाची वा न राबविलेल्या योजनेची काढुन स्वतः चे खिसे भरण्याचे काम करत आहेत.

जलजीवन मिशन योजनेच्या नळपाणी पुरवठा योजना चिंचोटी गावासाठी हर घर जल या योजनेतुन ग्रामपंचायतीने लावलेल्या फलकावरून चिंचोटी गावासाठी 76,16,345/- रुपये इतक्या रक्कमेच्या निधीची तरतुद शासनाने करून सदरची योजना राबविण्याची व अंमलात आणण्याची जबाबदारी ग्रा.पं. सरपंच , ग्रामसेवक , कार्यकारी अभियंता , उपविभाग अभियंता , तसेच कंत्राटदार झाद इंटरप्रायझेस यांच्यावर होती.

परंतु सरपंच, ग्रामसेवक, कार्यकारी अभियंता उपविभाग अभियंता व कंत्राटदार यांनी संगनमत करून येथील नागरीकांची ठकवणूक / फसवणुक करून काम पुर्ण न करताच खोटी बीले काढली आहेत. पाणी योजना पुर्ण केलेलीनाही.

वरील सर्वजण हे लोकसेवक असून येथील नागरीकांना क्षती पोहचवण्याच्या उद्देशाने या सर्वानी कायदयाची अवज्ञा केली आहे. सदरची जलजीवन योजना राबवून विहीत मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे निर्देष वरिष्ठांनी दिलेले असतानाही त्या निर्देषांचा भंग वर नमुद लोकसेवकांनी संगनमताने जाणीवपुर्वक सरकारी निधीचा अपहार / भ्रष्टाचार केला आहे. आम्हा नागरीकांना त्यांच्या अशा वागण्याने क्षती पोहचेल याची जाणीव असतानाही त्यांनी योजना पूर्ण न करताचा अर्धवट सोडलेली आहे.

चिंचोटी गावामध्ये अशाच प्रकारची ‘‘जल जीवन मिशन’’ योजना फक्त कागदावर ठेवून प्रत्यक्षात न उतरवता ग्रामपंचायत सरपंच सौ. बिंदीता बाबुराव पाटील, ग्रामसेवक पि.डी. दिवकर, कार्यकारी अभियंता श्री. वेगुर्लेकर उपविभाग अभियंता निहाल चवरकर यांनी संगनमताने लाखो रूपयांचा अपहार करून चिंचोटी गावाच्या ग्रामस्थांची फसवणुक करून पाण्यासारख्या मुलभुत गरजेपासुन वंचित ठेवले आहे.त्या मुळे सरपंच बिंदिता बाबुराव पाटील, तसेच कंत्राटदार झाद इंटरप्रायझेस, ग्रामसेवक पि.डी. दिवकर, कार्यकारी अभियंता श्री. वेगुर्लेकर उपविभाग अभियंता निहाल चवरकर या लोकसेवकांच्या विरूध्द् भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 318, 198, 199, 201 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करणेबाबतचा तक्रार अर्ज ॲड राकेश पाटील यांनी दाखल केला आहे.
___________________________________
चिंचोटी गावामध्ये सध्या प्यायला पाणी नाही ही वस्तुस्थिती आहे, योजना अपयशी झाली आहे, या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली असून जिल्हा परिषदेने प्रथम पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा,
अँड, राकेश नारायण पाटील
सामाजिक कार्यकर्ते