ग्रामीण भागात नळ पाणीपुरवठा योजनांच्या यशस्वी

32

ग्रामीण भागात नळ पाणीपुरवठा योजनांच्या यशस्वी

योगदानाबद्दल साहेबलाल मेश्राम शाखा अभियंता यांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909 

सिंदेवाही :- पाण्याविना जीवन अशक्यप्राय आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना अस्तित्वात नव्हत्या अशा परिस्थितीत जनतेला पाण्यासाठी अत्यंत कठिन परिस्थिती चा सामना करावा लागत होता. त्यातच तालुक्यातील बराच भाग जंगलव्याप्त ताडोबा या प्रकल्पास लागुन असल्याने हिंस्त्र व्याघ्र श्वापदाचा वावर आहे. गावामध्ये अस्तित्वात असलेल्या हातपंप व विहीरीवरून पिण्याच्या पाण्याचा वापर होत होता. परंतु उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी कमालीची कसरत करावी लागत होती. अश्या परिस्थितीत सन २०१९ मध्ये केंद्र व राज्य शासनाचा संयुक्त विद्यमाने जल जिवन मिशन’ ही ग्रामीण भागातील अस्तित्वात नळ योजनांची नुतनीकरण व नविन योजनांची कामे करण्याची योजना घोषित झाली

सदर योजनेच्या यशस्वीतेसाठी साहेबलाल मेश्राम , शाखा अभियंता , जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन साहेब व कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे साहेब याच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तालुक्यामधील गाव वाडी वस्तीचे सुक्ष्म नियोजन करुन ९९ योजनांचा आराखडा तयार करून जवळपास ५१ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली. ३३ गावांमधिल १००% नळ जोडणी करण्यात आली. त्यामध्ये तालुक्यातील १५ गावे ‘हर घर जल’ घोषित करण्यात आली
असुन, गावकऱ्यांना ५५ लीटर प्रमाणे दिवस प्रती व्यक्ती शाश्वत पाणी पुरवठा होत आहे. या योजनांसोबत गावामधील शाळा व अंगणवाडी मध्ये जल जिवन मिशन कार्यक्रमाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यांत आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहेबलाल मेश्राम शाखा अभियंता यांचे समर्पण व वक्तशीरपणा लक्षात घेण्यासारखा आहे. त्यांनी ब्रम्हपुरी सोबत सिंदेवाही उपप्रभागाचा प्रभार असलेल्या गावामध्ये सुद्धा मोलाचे बद्दल घडवून आणले आहे. या दोन्ही तालुक्यात नळ योजनांच्या कामाची प्रगती घडवुन आणण्यास कठोर परिश्रम घेत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन साहेब यांनी यंदाच्या प्रजासत्ताक दिनी -२६-जानेवारी २०२५ला मा. हर्ष बोहरे कार्य अभियंता तसेच नुतन सावन मैडम उप मु.का. अधिकारी तथा उपस्थित अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थित जाहीर सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेतः तसेच डॉ योगेश दुबे वरिष्ठ भुवैज्ञानिक व सोबत सुशिल गुडांवार वरीष्ठ लीपीक यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
मेश्राम साहेब, शाखा अभियंता, ग्रा.पा.१. उपविभाग ब्रम्हपूरी, मांच्या कार्याची दखल १५ ऑगस्ट-२०२3 स्वातंत्र दिनी व यावर्षी – २६ जानेवारी २०१५ला प्रजासत्ताक दिनी विशेष आमंत्रीत म्हणून दिल्ली येथे कार्यक्रमास बोलावून जलशक्ती मंत्रालय द्वारे सन्मानित करण्यात आले हे,विशेष
साहेबलाल मेश्राम शाखा अभियंता यांनी मा विवेक जॉनसन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच हर्ष बोहरे साहेब कार्यकारी अभियंता यांचे विशेष आभार मानले आहेत.