कृषीवार्ता: अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात !

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

एका काळी पावसाळ्यात पाऊस पडायचा, हिवाळ्यात कडक थंडी पडायची अन् उन्हाळ्यात अतिशय कडक ऊन पडायचे.त्या काळी मात्र लोकांचे जगणे हे, वेगळेच होते भलाही त्यांची परिस्थिती नाजूक होती पण, कसेतरी ते,जगायचे समाधानी रहायचे कारण, त्याकाळी निसर्गाचे संतुलन बिघडत नव्हते, प्रदूषणात वाढ होत नव्हती, सर्वामध्ये थोडीफार तरी माणुसकी जिवंत होती व आपुलकी होती पण, आताच्या सध्याच्या परिस्थितीत बघितले तर मात्र जमीन आसमानचा फरक जाणवताना दिसत आहे. म्हणूनच कदाचित निसर्गानेही आपले रुप बदलवले असावेत.

आज ह्या अवकाळी पावसामुळे बळीराजा हतास झालेला आहे. शेतात धान, मका व इतर पीक चांगल्याप्रकारे बहरून येताच ऐन तोडांवर आलेला घास अवकाळी पाऊस हिसकावून नेत आहे. हा घोर कलियुग आहे असे बरेचजण म्हणत असतात पण,बळीराजाच्याच जीवनात का म्हणून. ..? आज तो जगाचा पोशिंदा म्हटला गेलेला आहे पण, आज अशी भयंकर परिस्थिती त्याच्या जीवनात आली असेल तर तो जगाला पोसणार तरी कसा. ..? या अवकाळी पावसाचा फटका अनेकांना पडला असेल.. पण, सर्वात जास्त नुकसान आज बळीराजाच होत आहे. हि परिस्थिती कोणी बघावे..? कोणी आपुलकीने मदत करावी. काही लोक म्हणतात की, बळीराजाने नुसता पीकाला पाणी दिलं तरी पीक निघत असतो त्यांना काय माहीत की बळीराजा कसा जगतो आणि कोणत्या परिस्थितीतून निघत आहे.म्हणणे, बोलणे सोपे असते पण, सत्य जाणून मदतीला धावून जाणे तेवढेच कठीण काम असते कारण, ते सर्व करण्यासाठी माणसात काळीच असावे लागते पण,त्या प्रकारचे सर्वाकडे काळीज असेलच असे नाही .माहीत नाही म्हणूनच आज याच समाजात राहणारे बळीराजाला संकटात पाहून आपुलकीने मदत करायची सोडून घरबसल्या मस्तपैकी आनंद घेत आहेत. 

      उलट तेच म्हणतात की, आलेली परिस्थिती बघून बळीराजा का..आंदोलन करत नाही. पण,त्याने का म्हणून आंदोलन करावे..? बळीराजावर आलेले संकट पाहून सर्वजण एकत्र येऊन आंदोलन करायला पाहिजे. होऊ शकेल तर.. माणुसकी च्या नात्याने आपल्या वेतनातून थोडे पैसे त्याच्या खात्यात जमा करण्यासाठी शासना पर्यंत हि बातमी पोहोचवायला पाहिजे पण,तसं काहीही होताना दिसत नाही. फक्त, जो,तो,आपल्या भाषणात मोठ्याने म्हणतो “जय, जवान जय किसान” आता कुठे गेली बळीराजा विषयी आपुलकी. .? आणि नारे…? कारण, हा जमाना स्वार्थी झालेला आहे. बळीराजावर एवढे संकट आलेले पाहून सुद्धा या समाजात राहणारा एकही व्यक्ती आपुलकी च्या नात्याने मदत करतांना दिसत नाही. आजकाल फेसबुकवर नको त्या बातम्या दररोज बघायला मिळत असतात पण, बळीराजाच्या शेतावर या अवकाळी पावसामुळे पीकाची किती नासाडी झाली आहे हे, जगाला दाखविण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही. हि फार मोठी शोकांतिका आहे. आज याच अवकाळी पावसामुळे, गारपीटीमुळे,जोरात आलेल्या हव्यामुळे मक्याच्या दाण्याला कोंब फुटले आहेत, धान जमीनदोस्त झाला आणि इतर पीक सडून गेले आहेत एवढे सारे भंयकर संकट तेही गोर, गरीब, बळीराजा यांच्या वाट्याला आलेले आहेत. कित्येक लोकांची घरे पडलेली आहेत, कोणी बेघर झाले आहेत तर..कोणी वीज पडल्यामुळे मृत्यूमुखी पडले आहेत . कोणाच्या शेळ्या, मेंढ्या, गाई,मैस्ह सुध्दा मृत्यूमुखी पडले आहेत या अशा भयानक परिस्थितीने पूर्णपणे सिमा गाठली आहे. म्हणून आज बळीराजा चिंतेत पडला आहे. 

        कधी कोणी बघितले नसतील एवढ्या कडक उन्हाळ्यात नदी दुथडी वाहून जात आहे. खरच आपण काय समजावे..? सकाळी ऊन पडते खरी पण, संध्याकाळी जोरात पाऊस पडतो त्याला कोणीही थांबवू शकत नाही हे, सत्य आहे पण, बळीराजावर आलेले संकटे बघून त्याच्या मदतीसाठी एक हात पुढे करायला तर.. काही हरकत नाही. आणि हे, करायलाच पाहिजे कारण, तो,जगाचा पोशिंदा आहे आज तो, अडचणीत सापडला आहे तर त्यासाठी धावून जाणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य नाही का..? नुसते बोलूनच दाखविण्यापेक्षा करून दाखविण्यात खरा माणुसकी धर्म असतो. तोच धर्म प्रत्येकांनी बळीराजासाठी निभावून दाखवायला पाहिजे. तेवढीच नुकसान भरपाई शासनाने सुद्धा द्यायला पाहिजे. आज बळीराजा चिंतेत पडला आहे, भंयकर संकटात सापडला आहे त्याला वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन त्याची थोडी कदर करायला पाहिजे. शेवटी तो, जगाचा पोशिंदा महापुरुष आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here