Home latest News म्हसळा न्यू इंग्लिश स्कूल दहावीचा निकाल ९८.८८ टक्के; कु. तनुष्का मंगेश कदम...

म्हसळा न्यू इंग्लिश स्कूल दहावीचा निकाल ९८.८८ टक्के; कु. तनुष्का मंगेश कदम प्रथम

10

म्हसळा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी – मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत दहावी परीक्षेचा निकाल आज दि. ८ मे २०२६ रोजी अधिकृतपणे जाहिर करण्यात आला. केंद्राचा एकुण निकाल ९३.६ टक्के लागला असून परिक्षेत एकूण ६०४ विद्यार्थी बसले असून ५५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा मध्ये ९० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून ८९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९८.८८ टक्के निकाल लागला आहे. यावेळी देखील मुलींनी बाजी मारली असून कु. तनुष्का मंगेश कदम या विद्यार्थीनीने ५४३ मार्क मिळाले असून ९३.२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. ८८.६ टक्के गुण मिळवुन कु. श्रेयस समीर पवार याने व्दितीय क्रमांक तर ८७.४ टक्के मिळाल्याने कु. श्रेया दिपक मोरे हिचा एन टी मधून प्रथम क्रमांक मिळाला. तर पहिल्या पाच मधुन कु. श्रवण सुरेश गायकर ८७ टक्के व कु. वैभवी बाळु मगर हिला ८५.८ टक्के तसेच कु. श्रावणी शरद नांदगावकर, कु. प्राप्ती संजय नांदगावकर, कु. आर्या सुदर्शन एलवे या विद्यार्थीनींना प्रत्येक ८६.६ टक्के गुण मिळाले व कु. वरुणकुमार रामु सोमपर याला ८५.२ टक्के गुण मिळाले. यावेळी देखील सरासरी मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विविध स्तरातून कौतुक होतांना दिसत आहे.