लो. म. प. स. अध्यक्ष व संचालक श्री सचिन बोंबले सर यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सोबत संघाच्या हितासाठी घेतली भेट
महसूल मंत्री नवमदार बाळासाहेब थोरात यांना लोकशाही मराठी पत्रकार संघाची डायरी दिली भेट
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-8208166961
पुणे : – सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की लोकशाही मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संस्थापक यांनी आज महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली व आपल्या लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या काही गहन प्रश्नावर विचार चर्चा केली आणि कशाप्रकारे चालते ते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगितले व सध्याच्या परिस्थितीत काही पत्रकार बांधवावर होते असलेल्या , जीवे मारण्याच्या धमक्या पत्रकारां सोबत होत असलेले अपमानास्पद वागणूकी बद्दल त्यांना अवगत करून दिले व आपण यावर विशेष लक्ष केंद्रित करावे अशी विनंती देखील यावेळी श्री सचिन बोंबले सरांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना केली .
पत्रकारासाठी अहोरात्र झटणारे लोकशाही मराठी संघाची डायरी देखील सचिन बोंबले सर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेट म्हणून दिली ,
सचिन बोंबले सर यांचे पूर्ण व्याख्यान ऐकून त्यांच्या शब्दांना समर्थन देत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आस्वासन दिले की आपल्या पत्रकार बांधवावर कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मी सदैव तयार असतो व राहील अशी शास्वती दिली आणि त्यांनी म्हटले की, लोकशाही चा चवथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारांवर अन्याय सहन केल्या जाणार नाही तो कोणीही असो त्यांच्यावर कायद्याने सक्त कडक कारवाई करण्यात येईल असे आस्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्री सचिन बोंबले सर यांना यावेळी दिले . सचिन बोंबले सरांनी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे यावेळी आभार मानले .