Home latest News तुमसर येथे सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांचा सत्कार

तुमसर येथे सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांचा सत्कार

74

तुमसर येथे सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांचा सत्कार

तुमसर येथे सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांचा सत्कार

मिथुन लिल्हारे मीडिया वार्ता न्युज 📱8806764515📱

मोहाडी :- तुमसर येथील उमरवाडा येथे सम्राट अशोक सेना संपादक व पत्रकार सेवा संघ, ध्रुवतारा संघटना ,व जीवन आधार फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रात पत्रकारितेमध्ये यांचे मोलाचे योगदान आहे. अशांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांना शाल फळ पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अशोक सम्राट सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुळशीराम गेडाम, सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम ,उमरवाडा चे सरपंच नंदलालजी गुर्वे ,उपसरपंच गणेश बनकर ,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे चे उपाध्यक्ष पंकज वानखेडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष गंगाधर बागडे ,विदर्भचंडिकेचे पत्रकार दिगंबर देशभ्रतार, मंजुषा ताई देशभ्रतार, वर्षाताई देशभ्रतार, अशोक सम्राट सेनेचे तुमसर तालुका अध्यक्ष हरिदास बोरघरे,व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.