Home latest News मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पूर परिस्थिती पाहणीसाठी गडचिरोलीला प्रस्थान

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पूर परिस्थिती पाहणीसाठी गडचिरोलीला प्रस्थान

64

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पूर परिस्थिती पाहणीसाठी गडचिरोलीला प्रस्थान

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पूर परिस्थिती पाहणीसाठी गडचिरोलीला प्रस्थान

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

नागपूर,: – दुर्गम अश्या गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पावसामुळे त्यांनी विमानतळ ते गडचिरोली असा रस्त्याने प्रवास केला.तत्पूर्वी विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे – चवरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर , पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वागत केले.विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांनी त्यांना विमानतळावर पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा दिला. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरऐवजी रस्ते मार्गाने त्यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले.