विवाहीत मुलीने आईचा केला खून.
अनिता आणि शिवानंद जाधव असलेल्या अनैतिक संबंधास लक्ष्मीबाई माने विरोध करत असल्याने खून केल्याची चौकशीत कबुली अनिताने दिली.
सोलापूर:- जिल्ह्यातील कुमठे येथील लक्ष्मीबाई माने या महिलेचा घरात गळा आवळून खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. दिरासोबत अनैतिक संबंधाला विरोध केल्याने मुलीनेच आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
लक्ष्मीबाई माने असे खून झालेल्या महिलेचे नाव असून या प्रकरणी अनिता महादेव जाधव व शिवानंद भीमप्पा जाधव यांना अटक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुमठे येथील लक्ष्मीबाई माने या महिलेचा घरात गळा आवळून खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांनी तपासादरम्यान संशयावरून त्यांची मुलगी अनिता जाधव आणि तिचा दीर शिवानंद जाधव या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत अनिता आणि तिच्या दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधास लक्ष्मीबाई माने विरोध करत असल्याने खून केल्याची कबुली अनिताने दिली. दोघांना मंगळवारी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.









