Home latest News घराचे खोदकाम करताना सापडली बाराव्या शतकातील अतिप्राचीन ‘श्रीकृष्णाची’ मूर्ती

घराचे खोदकाम करताना सापडली बाराव्या शतकातील अतिप्राचीन ‘श्रीकृष्णाची’ मूर्ती

121

घराचे खोदकाम करताना सापडली बाराव्या शतकातील अतिप्राचीन ‘श्रीकृष्णाची’ मूर्ती

घराचे खोदकाम करताना सापडली बाराव्या शतकातील अतिप्राचीन 'श्रीकृष्णाची' मूर्ती

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 12 फेब्रुवारी
जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अश्मयुगाच्या खानाखुणा चंद्रपुरात सापडतात. मोर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट,चालुक्य, नाग, परमार, गोंड, भोसले यांची राजवट जिल्ह्यात होती. इतिहासाची साक्ष देत अनेक देखण्या वास्तू आजही जिल्ह्यात उभ्या आहेत. आता नव्याने चंद्रपूरच्या इतिहासात भर पडली आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच श्रीकृष्णाचे शिल्प सापडले आहे. सापडलेले शिल्प चालुक्य काळातील असून बाराव्या शतकातील आहे. खेडमक्ता येतील गजानन मानकर यांना खोदकाम करताना ही मूर्ती सापडली. त्यांनी मूर्तीला दुग्धभिषेक घातला. यावेळी प्रमोद मानकर, सचिन मेश्राम, गुरुदेव मानकर मारोती मेश्राम, गिरिधर गुरपुडे, मुकुंदा गुरपुदे, योगेश तुमडे, संदीप गुर्पुडे, केशव मानकर उपस्थित होते. मूर्ती सापडल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. ही मूर्ती आढळून आल्यानंतर नागरिकांनी तिची पूजा केली. ही प्राचीन मूर्ती असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे ही मूर्ती पाहण्यासाठी गर्दी होतेय.
शौचालय बांधकामासाठी खड्डा खोदणं सुरू होतं. सात फूट खोल खड्डा खोदून झाला होता. अन् काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तो केवळ दगड नसून श्रीकृष्णाचे सुरेख शिल्प होतं. शिल्प सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली. मूर्तीला दुग्धभिषेक करत हात जोडले. ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांना ही मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून चालुक्य काळातील असल्याचं इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी सांगितलं. श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.

•अशी आहे शिल्पाची रचना

सापडलेले शिल्प दक्षिणात्य शैलीतील आहे. शिल्प काळ्या दगडावर कोरलेलं आहे. श्रीकृष्णाच्या डोक्यावर करंडक मुकुट असून हातात बासरी आहे. दोन्ही बाजूला दक्षिणात्य शैलीतील मंदिर कोरलेलं आहे. चालुक्यकाळात या भागात श्रीकृष्णाच्या एखादं मंदिर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भागात अधिक संशोधन केल्यास इतिहासाला उजाळा मिळू शकतो.