अखेर कोश्यारींचा राजीनामा मंजूर, ‘हे’ असणार नवे राज्यपाल

66

अखेर कोश्यारींचा राजीनामा मंजूर, ‘हे’ असणार नवे राज्यपाल

अखेर कोश्यारींचा राजीनामा मंजूर, 'हे' असणार नवे राज्यपाल

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

मुंबई : 12 फेब्रुवारी
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर केला. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. तसेच, रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.