Home latest News विदर्भ युवोत्सवात सरदार पटेल महाविद्यालय अव्वल

विदर्भ युवोत्सवात सरदार पटेल महाविद्यालय अव्वल

96

विदर्भ युवोत्सवात सरदार पटेल महाविद्यालय अव्वल

विदर्भ युवोत्सवात सरदार पटेल महाविद्यालय अव्वल

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 12 फेब्रुवारी
युवक बिरादरी भारत व रेनायसेन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विदर्भ युवोत्सव २०२३ अंतर्गत विविध स्पर्धा झाल्या. यातील चित्रकला, रंगोली, तालवाद्य, समूहगान, टॅलेंट परेड, वादन व संगीत अशा विविध स्पर्धामध्ये सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत पुरस्कार पटकावून अव्वल स्थान मिळविले.
चित्रकला स्पर्धेत शुभम अधिकारी, रांगोळी स्पर्धेत आकाश मडावी (प्रथम), वादन – संगीत जयकुमार रंगारी (द्वितीय), समूहगान स्पर्धेत साहिल, वैभवी, मोनिका, जयकुमार, शंतनू, गायत्री, प्रणाली, अनिकेत, अजय, स्मृती, समीक्षा यांनी प्रथम क्रमांक मिळवला. यशासाठी प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अजय बेले आदींनी मार्गदर्शन केले.