Home latest News सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता नियंत्रित शिधाजिन्नसांचे मोफत वितरण.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता नियंत्रित शिधाजिन्नसांचे मोफत वितरण.

67

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता  नियंत्रित शिधाजिन्नसांचे मोफत वितरण.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता  नियंत्रित शिधाजिन्नसांचे मोफत वितरण.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता  नियंत्रित शिधाजिन्नसांचे मोफत वितरण.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर दि.12 मे:- बल्लारपूर तालुका शिधापत्रिका क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर निश्चित करण्यात आले असून राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नियमित गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे.

असे राहतील वितरित करण्यात येणाऱ्या शिधाजिन्नसांचे वस्तूंचे दर व परिमाण:

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना गहू प्रति व्यक्ती 3 किलो तर तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो यानुसार मोफत देय राहील.

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गहू प्रति शिधापत्रिका 15 किलो व तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो यानुसार मोफत देय राहील, तर साखर 20 रुपये प्रति किलो दराने, प्रति शिधापत्रिका 1 किलो शिधापत्रिका धारकांना देय राहील.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना गहू व तांदूळ मोफत असून गहू प्रति व्यक्ती 3 किलो तर तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो परिमाणाने देय राहील.

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गहू व तांदूळ मोफत असून गहू प्रति व्यक्ती 3 किलो तर तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो परिमाणाने देय राहील. असे बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.