जीव धोक्यात घालुन होत आहे लसीकरण; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा. 
जीव धोक्यात घालुन होत आहे लसीकरण; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा. 

जीव धोक्यात घालुन होत आहे लसीकरण; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा. 

जीव धोक्यात घालुन होत आहे लसीकरण; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा. 
जीव धोक्यात घालुन होत आहे लसीकरण; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा.

आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒

वर्धा,दि.13 मे:- आज राज्यात आणि जिल्हात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जनता कोरोना लसीकरण करत आहे. पण वर्धा जिल्हातील धामणगाव रेल्वे, कोविड लसीकरण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरु आहे. लसीकरणासाठी आरोग्य केंद्रामध्ये तोबा गर्दी होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दररोज पहावयास मिळत आहे. गर्दीमुळे नागरिकांना कोविडची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीकरण केंद्र कोरोनाचे हॉटस्पॉट होऊ नयेत, याची खबरदारी घेणे आता गरजेचे आहे.

लसीकरणाच्या बाबतीत प्रशासनाच्या नियोजनाची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे व त्यामुळे सर्वत्र गर्दीचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रावर शासनाने लसीची व्यवस्था केल्यास गर्दी आणि गोंधळ कमी होईल. मात्र, सध्यातरी असे काही नियोजन होताना दिसत नाही. तालुक्यात ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 50 लोकांनी आपला जीव गमावला आहे
सुरुवातीच्या काळात काही गावांमध्ये कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. नंतर लस तुटवडा असल्याने लसीकरण मोहीम बंद केली गेली. सध्या गावोगावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण रूग्णालयात लस घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. लस मिळते की नाही, या विचाराने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. गर्दीमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे. आरोग्य प्रशासनाने याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

धामणगाव तालुक्यात सध्या कोविड लसीकरण सुरू आहे. लस पुरवठा टप्याटप्याने होत आहे. त्यानुसारच लसीकरण करण्यात येत आहे. परंतु, आपल्याला तात्काळ लस मिळावी या प्रयत्नात नागरिक आहे. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी गैरसमज होऊन त्याचे रूपांतर वाद विवादात होते. आरोग्य कर्मचार्‍यांचे मनोधर्य कमकुवत होत आहे. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here