Home latest News कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील १२ प्रतिष्ठनांवर मनपा ने केली कारवाई; 93 हजारांचा...

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील १२ प्रतिष्ठनांवर मनपा ने केली कारवाई; 93 हजारांचा रुपयांचा दंड वसूल.

73

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील १२ प्रतिष्ठनांवर मनपा ने केली कारवाई; 93 हजारांचा रुपयांचा दंड वसूल.

या दुकानावर कार्यवाही का नाही? व्यापाऱ्यांनी केला मनपा ला प्रश्न बालाजी ट्रेडींग कं., रविंद्र ट्रेडींग कं. आणि, सोसायटी ट्रे

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील १२ प्रतिष्ठनांवर मनपा ने केली कारवाई; 93 हजारांचा रुपयांचा दंड वसूल.
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील १२ प्रतिष्ठनांवर मनपा ने केली कारवाई; 93 हजारांचा रुपयांचा दंड वसूल.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर : सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने बाजारपेठा दुपारी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दहात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (ता. १२) मनपाचे उपायुक्त विशाल वाघ यांच्या उपस्थितीत शहरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे पांच्यासह झोन क्रमांक २ सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भुपेश गोठे, श्री. पचभुने व झोन २ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

चंद्रपूर शहरात दुपारी १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याची मुभा आहे. परंतु दिलेल्या वेळेनंतर सुरू असलेल्य प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. पात सोसायटी ट्रेडर्स कडून २० हजार गुगोल कलेक्शन हजार श्री गणेश साही सेंटर हजार डायमंड ग्लास सुरू असल्याप्रकरणी ५ हजार, अनिकेत जैन 5 हजार नयन बडवाईक २ हजार, रमेश मून ५ हजार शिवशक्ती प्रिंटिंग प्रेस १५ हजार सिकटेक टाईल्स १५ हजार, बेले हार्डवेअर २ हजार पियुष अग्रवाल ३ हजार शशांक अग्रवाल 3 हजार असे एकूण 93 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

चंद्रपूर शहरातील काही व्यापारी दुकानाचे शटर लावून व्यापार करताना आढळले. त्याच्यावरही चंद्रपूर मनपा उपायुक्त, सहायक आयुक्त आणि टीम ने कडक कारवाई केली. तसेच पापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई सोबत गुन्हा करण्याचे सूतोवाच देखील चंद्रपूर मनपाने केले. यासोबतच किराणा दुकानदार व सुपर मार्केट व्यावसायिकांना सुद्धा सूचना देण्यात आल्या की २३ वाजेनंतर दुकान करण्यास विलंब झाल्यास कारवाई करण्यात येईल. त्या दुकानावर कार्यवाही का नाही? व्यापाऱ्यांचा सवाल गांधी चौक ते आंबेडकर पुतळ्याच्या मधात येणारे जिल्ह्यातील सर्वात मोठे इलेक्ट्रिकल शॉप मोठ्या समोरचे हार्डवेयर, गल्लीबोळातले दुकानदार ग्राहकांना दुकाना बाहेर उभे ठेऊन थोडे शटर उघडून सामान देत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांनी केली आहे. एकीकडे मनपातील अधिकारी धडक मोहीम राबवित आहे पण मनपा कार्यालयाच्या नाकाजवळच्या या दिग्गज व्यापाऱ्यांना शटर पाहून व्यवसाय करण्याची सूट का असा प्रश्न सर्वसाधारण व्यापारी मनपा ला करीत आहे.