Home latest News नक्षल्यांनी आरक्षणावर आपली भुमीका केली जाहीर. मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहावे..

नक्षल्यांनी आरक्षणावर आपली भुमीका केली जाहीर. मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहावे..

74

नक्षलवादयानी पहिल्यांदा आरक्षणावर आपली भुमीका केली जाहीर. मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहावे..

नक्षलवादयानी पहिल्यांदा आरक्षणावर आपली भुमीका केली जाहीर. मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहावे..

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
गडचिरोली,दि.12 जुन:- सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय जोर धरत आहे. मराठा समाज सरकार विरुद्ध आंदोलनाच्या तयारीत आहे. त्या नक्षलवादयानी पहिल्यांदा आरक्षणावर आपले मत पत्रकाच्या माध्यामातुन मांडले आहे. आरक्षण हा खुळखुळा आहे. त्यात आपली शक्ती खर्च घालू नका. मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा ते तुमच्यातील संघटित शक्तीला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत आहे, अशा आशयाचे पत्रक भारताची कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) यांनी छापून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नक्षलवाद्यांनी प्रथमच भूमिका उघड केली आहे.

मराठ्यांना आरक्षणासाठी लढावे लागणे म्हणजे देशावरील कृषी संकटाचा भाग आहे. आरक्षण कोणत्याही समाजाला न्याय-समानता देऊ शकला नाही. काळाच्या ओघात जसे अन्य समाजीतील नागरिकांमध्ये बदल होत आहे तसे बदल मराठा समाजातही होत आहे. स्वताच्या मेहनतीवर जगणारा शेतकरी समाज आज आरक्षणासाठी ओरडत आहे. ही समस्या म्हणजे देशीतील कृषी संकटाचेच लक्षण आहे. याला सरकारी धोरण जबाबदार, असेही पत्रात नमुद आहे.

देशातील सर्वच पक्षांच्या नेत्यांची नियत खोटी आहे. ते मराठा समाजाचे हीत कधीच साधणार नाही. त्यांचे गणित देन बाबींवर अवलंबून असते. मराठी समाच त्यांना केवळ वोट बँकेसाठी पाहीजे आहे. महाराष्ट्राच्या सत्तेवर जास्तीत जास्त काळ मराठा समाजातून आलेले नेते मंडळी राहिली आहे. असे असतानाही मराठा समाजाची अशी अधोगती का झाली, असेही पत्रकात नमुद आहे.