Home latest News पुलिस स्टेशन सिंदेवाही तर्फे भव्य रक्तदान शिबिर

पुलिस स्टेशन सिंदेवाही तर्फे भव्य रक्तदान शिबिर

79

पुलिस स्टेशन सिंदेवाही तर्फे भव्य रक्तदान शिबिर

पुलिस स्टेशन सिंदेवाही तर्फे भव्य रक्तदान शिबिर

अमान क़ुरैशी
प्रतिनिधि सिंदेवाही तालुका
8275553131

सिंदेवाही :- चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताच्या तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपूर यांना झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेण्याबाबत आदेशित केले होते ।
त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून सिंदेवाही पोलीस ठाणे येथे दिनांक 11/6/2024 रोजी सिंदेवाही तालुक्यातील सर्व संघटना व मंडळे यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे ठरविले।
त्याकरिता मागील 10 दिवसापासून पोलीस पाटील विविध संघटना युवक मंडळे विविध सामाजिक व धार्मिक संस्था यांच्या बैठकी घेण्यात आल्या। त्याबाबत सर्व स्तरावरून सकारात्मक प्रतिसाद मिळू आला।
त्या अनुषंगाने सिंदेवाही तालुक्यातील सर्व पुलिस पाटील,शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती,वन विभाग सिंदेवाही,नगरपंचायत सिंदेवाही लोनवाही, होमगार्ड पथक तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव,महिला वर्ग, युवक यांच्या सहकार्याने आगामी 14 जून जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून त्याकरिता सामाजिक उपक्रम राबवून पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे दिनांक 11/6/2024 रोजी सकाळी आठ वाजता पासून सायंकाळी पाच वाजता पर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले! ह सदर रक्तदान शिबिरात तालुक्यातील सर्व स्तरावरून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याने एकूण 375 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला!
सदर रक्तदान शिबिरात पहिल्यांदा रक्तदान करणारी युवा व महिला रक्तदात्यांचे 👌प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला तसेच 50 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारे रक्तदात्यांचे मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
आहे वरील कार्यक्रम श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून श्रीमती रीना जनबंधू अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व श्री दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुश्सर चव्हाण,सहपोलीस निरीक्षक अतुल स्थूल,
पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदोरे,पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले व सहकारी पोलिस अंमलदार रणधीर मदारे,सत्यवान सुरपाम,मंगेश मात्रे,शरद सावसाकडे,संजीव गेडेकर ,सुरज जाम्बुळे, डॉक्टर अमित प्रेमचंद,डॉक्टर मिलिंद झाडे,पंकज पवार (समाजसेवक अधीक्षक) व त्यांचे रक्तपेढी चंद्रपूर येथील पथक व डॉक्टर रोहन झाडे ग्रामीण रुग्णालय “सिंदेवाही व त्यांचे वैद्यकीय पथक यांनी पार पाडली।
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व पोलीस पाटील शांतता समिती सदस्य महिला दक्षता समिती नगरपंचायत कर्मचारि तालुक्यातील होमगार्ड पथक तसेच तालुक्यातील सर्व युवा वर्ग व महिला वर्ग यांनी अथक प्रशिक्षण परिश्रम घेतल्याने पोलीस ठाणे सिंदेवाही तर्फे अभिनंदन केले।