शिस्ते गावातील राजेश रामकृष्ण चव्हाण यांचा भारतातील 100 changemakers यादीत समावेश
✍️सचिन सतिश मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞
दिघी -श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावातील सुपुत्र व आशिर्वाद फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. राजेश रामकृष्ण चव्हाण यांना भारतातील 100 changemakers यादीत स्थान मिळाले आहे. ही यादी MIT Sloan Management Review India ने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
श्री. चव्हाण यांनी सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देऊन आपलं नाव उज्ज्वल केलं आहे. या यादीत त्यांचा समावेश होणं ही शिस्ते गावासाठी व श्रीवर्धनकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
त्यांच्या कार्यामुळे शिस्ते गावाची ओळख राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. गावकऱ्यांकडून, सर्व पंचक्रोशीतून त्यांचं कौतुक केलं असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री. चव्हाण यांचे कुटुंबीयही त्यांच्या या यशामुळे आनंदित झाले आहेत. हा पुरस्कार गावाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीला नवी दिशा देईल, अशी आशा व्यक्त होत आहे.









