जोगेश्वरीत एक मजली शौचालयाचे लोकार्पण संपन्न

जोगेश्वरीत एक मजली शौचालयाचे लोकार्पण संपन्न

जोगेश्वरीत एक मजली शौचालयाचे लोकार्पण संपन्न

पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं.- 8149734385

जोगेश्वरी:- जोगेश्वरी पूर्वेकडील आमदार श्री. रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या वॉर्ड क्रमांक ७५ मधील अंबिकानगर येथील एक मजली शौचालयचे उदघाटन आज नगरसेवक श्री. प्रवीण शिंदे यांच्या उपस्थितीत आणि स्थानिक रहिवाशीयांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फीत कापून करण्यात आले.
नगरसेवक श्री. प्रवीण शिंदे यांच्या प्रयत्नाने व जनसेवा संघाच्या माध्यमातून एस. पी. Enterprise यांनी सदर शौचालय उभारले आहे. सदर शौचालयात आंबिकानगर मधील दाट वस्तीतील रहिवाशांसाठी साधारणतः एकोणतीस शौचालय निर्माण केले आहेत. महिलांसाठी, पुरुषांसाठी तसेच वृद्ध, दिव्यांग व्यक्तीसाठीदेखील विशेष शौचालय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
याप्रसंगी नगरसेवक श्री. प्रवीण शिंदे, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, उपविभाग प्रमुख बाळा साटम, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, महिला शाखा संघटक सुचित्रा चव्हाण, शाखा समन्व्यक अंकुश नार्वेकर आदी पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक रहिवाशी बहुसंख्येने उपस्थितीत होते.