Home latest News भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर...
*भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.*
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076
मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य आदेशानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त श्री. अनमोल सागर (भा.प्र.से.) यांचे अध्यक्षतेखाली आज दिनांक 11.11.2025 रोजी सकाळी 11:00 वाजता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या 23 प्रभागांकरिता प्रभाग आरक्षण सोडत मानसी भारत गडा पदवी महाविद्यालय (विज्ञान व वाणिज्य), शांती चंदन सभागृह (हॉल), तळमजला, भिवंडी रोड रेल्वे स्टेशनजवळ, अंजूरफाटा, भिवंडी येथे आयोजित करण्यात आले होते. सदर सोडतीमध्ये नगरविकास विभाग अधिसुचना क्रमांक एमसीओ २०२४ /प्र.क्र.१८१/नवि १४ दि.२० मे २०२५ आणि मा. निवडणुक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/मनपा२०२५/प्र.क्र.४३/का ५, दि.२४/१०/२०२५ व समक्रमांकाचे पत्र दि.२७/१०/२०२५ मधील तरतुदी नुसार शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले असून एकूण 23 प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. या सोडतीप्रसंगी भिवंडी महानगरपालिका (आयुक्त तथा प्रशासक) अनमोल सागर (भा.प्र.से) (अतिरिक्त) आयुक्त विठ्ठल डाके, उप-आयुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे, सहाय्यक आयुक्त (आरोग्य) शैलेश दोंदे, (सहाय्यक आयुक्त निवडणूक) अजित महाडिक, (माहिती व जनसंपर्क अधिकारी) श्रीकांत परदेशी तसेच महानगरपालिकेचे इतर अधिकारी व शहरातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच सदर सोडत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यु टयुब या समाज माध्यमावर करण्यात आले होते. एकुण ११०० लोकांनी प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यु टयुब या समाज माध्यमावर पाहिले. सदर सोडतीचा निकाल राज्य निवडणुक आयोगास मान्यतेकरिता पाठविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सोडतीबाबत ज्यांना आक्षेप अथवा हरकती नोंदवावयाच्या असतील त्यांनी आपले हरकती अर्ज दि.१७/११/२०२५ ते दि.२4/११/२०२५ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत निवडणुक विभाग, नविन प्रशासकिय इमारत, पहिला मजला येथे सादर करावेत. तसेच सोडत कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले.