Home latest News पनवेल महानगरपालिका क्षेत्रात इच्छुकांची मांदियाळी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात इच्छुकांची मांदियाळी

101

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात इच्छुकांची मांदियाळी

आरक्षण सोडत नंतर.. आता उमेदवार निवडीचा लागणार कस

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी

पनवेल: पनवेल महानगरपालिका निवडणूक 2025 आरक्षण सोडतीत राजकीय वर्तुळातील हालचालींना चांगल्याच वेग आलेला पाहायला मिळतोय. तसेच अनेक दिग्गज आणि माजी नगरसेवकांना दिलासा मिळाल्याचं चित्र या क्षेत्रात पाहायला मिळालंय.
पालिका क्षेत्रात एकूण २० प्रभाग रचना असून तळोजा प्रभाग क्र. १ मधून भाजपातून नाराज होऊन काँग्रेसवाशी झालेले माजी नगरसेवक हरेश केणी यांनी मात्र आरक्षण सोडतीवर समाधानी आहेत.
खारघर प्रभाग क्र.४,५,६ मधील आरक्षण कायम राहिले असून माजी नगरसेविका लीना गरड यांनी समाधान व्यक्त केलंय.
कामोठे प्रभाग क्र.११,१२,१३ हा अनुसूचित जाती साठी राखीव ठेवला असून, गायकवाड यांचं पुनरागमन यानिमित्ताने होऊ शकतं असं बोललं जातंय.
कळंबोली येथील प्रभाग क्र. ८ हा मातब्बर मंडळीचा गणला जातो. या प्रभागात काटे की टक्कर होणार यात शंका नाही. या प्रभागातून राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील तर शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व माजी नगरसेवक बबन मुकादम ही मातब्बर मंडळी रिंगणात उतरणार आहेत, तर शेवाळे यांचे खंदे समर्थक तुकाराम सरक यांचा हिरमोड झाल्याने पत्नी सायली सरक यांच्या तयारीची सुरुवात केल्याचं कळतंय.
प्रभाग क्र.७ सात मध्ये महिलांचे वर्चस्व पाहायला मिळेल. तसेच भाजपाचे अमर पाटील, राजेंद्र शर्मा हे दावेदार असून तर काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील शिवसेना ठाकरे गटाचे प्रदीप ठाकूर, शेकापचे चंद्रकांत राऊत हे रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जातंय.
प्रभाग क्र. १० मध्ये शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र चव्हाण आता भाजपच्या गोटात असून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यासोबत विजय खानवकर, अशोक मोटे, सरस्वती कथारा , संदीप म्हात्रे व माजी नगरसेविका मोनिका महानोवर रिंगणात उतरणार असल्याचं वृत्त आहे.

पनवेल प्रभाग क्र. १८,१९ मधून भाजपचे सभागृहनेते परेश ठाकूर यांचा मार्ग मोकळा असून, युतीतील माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमण हे प्रमुख दावेदार मानले जातात. तसेच विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे व विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील दोहोंच्या पत्नींची उमेदवारी निश्चित असल्याचं कळतंय.

नवीन पनवेल प्रभाग क्र.१७ मधून माजी नगरसेवक ॲड. प्रकाश बिनेदार यांचा मार्ग मोकळा होऊन शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त आहे,तर माजी नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्यातील कोणाचा पारड जड ठरतंय ते पाहणं औस्तुक्याचं ठरेल.

प्रभाग क्र.१६ मधून माजी महापौर कविता चौतमोल यांचे पती किशोर चौतमोल स्वतः रिंगणात उतरणार असून संतोष शेट्टी, समीर ठाकूर हे ही प्रबळ दावेदार मानले जातात, तर आरपीआयचे प्रभाकर कांबळे हे ही मैदानात उतरण्यास सज्ज आहेत.

खांदा कॉलनी प्रभाग क्र.१५ मधून माजी उपमहापौर सीताताई पाटील यांच्यासोबत माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड हे प्रबळ दावेदार तर, सनी भोपी, मोतीराम कोळी, भीमराव पोवार, गणेश पाटील, शिवाजी थोरवे अशी इच्छुकांची लांबच लांब यादी पाहायला मिळते.
या आरक्षण सोडतीतून सत्ताधारी महायुतीतील भाजप शिवसेनेसहित महाआघाडीतील घटक पक्षांना उमेदवार निवड करताना डोकेदुखी तर ठरणार नाही ना? हे पहावं लागेल.