Home latest News आशिष लाथ” याने क्रेडिट कार्ड चा स्मार्ट वापर करत कमावले १५ लाखाचे...
“आशिष लाथ” याने क्रेडिट कार्ड चा स्मार्ट वापर करत कमावले १५ लाखाचे दागिने,४३० विमान प्रवास,१०० दिवसाचे हॉटेल बुकिंग.
भागवत जाधव,
अलिबाग.अलिबाग: सध्या टीव्हीवर चालु असलेल्या “शार्क टॅक” या शो मध्ये आशिष लाथ याने क्रेडिट कार्डचा स्मार्ट उपयोग कसा करावा हे दाखवून दिले.
गुरुग्राम येथील आशिष लाथ व त्यांची पत्नी खिशातून एक रुपया सुद्धा खर्च न करता तब्बल ४३० वेळा विमान प्रवास,१०० रात्री हॉटेल मुक्काम,१५ लाखाचे दागिने खरेदी केले हे सगळे कोणतीही फसवणूक न करता आर्थिक समज, आणि शिस्त बद्ध नियोजनाने हे केले.
आशिष ने क्रेडिट कार्डकडे कर्ज म्हणून नाहीतर फायद्याचं साधन म्हणून पाहिले जिथे त्यांना कॅशबॅक, रिवॉर्ड पॉईंट, कॉइन्स, ऑफर आहेत त्या ठिकाणी कार्ड वापरून संधीचे सोने केले.
या त्यांच्या स्वभावामुळे वैयक्तिक अनुभवातून त्यांनी “सेव्हसेज” ऍप त्यांनी डेव्हलप केले आहे याचा फायदा सर्व सामान्य व्यक्ती साठी होईल असे त्यांना वाटते. त्या साठी “शार्क टॅक”या शो मध्ये भागीदारी(sponsers) मिळवण्यासाठी भाग घेतला होता त्यात ते यशस्वी झाले.