शासकीय व्यावसायिक अर्थसहाय्य मार्गदर्शन शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न 

गुणवंत कांबळे,

मुंबई प्रतिनिधी

मो.नं.९८६९८६०५३०

मुंबई- शनिवार दि. ११ मार्च २०२३ रोजी मुंबईच्या सायन कोळीवाडा मधील विश्वशांती बुध्द विहार कार्यालय येथे शासकीय कृषि विभाग, ठाणे जिल्हा, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक अधिकारी, आयु. रविंद्र अनंत तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नव उद्योगकांसाठी मैत्रांगण सामाजिक संस्था आणि सेलिब्रेशन झोन केक शॉप टीम*ल आयोजित ‘व्यावसायिक शासकीय अर्थसहाय्य मार्गदर्शन शिबीर’ नव उस्फुर्त प्रतिसादाने संपन्न झाले.

ब-याच वेळा नव्याने उद्योग सुरु करताना व्यवहारासंदर्भातील अर्धवट ज्ञाना अभावी, आवश्यक कागदपत्रां अभावी, ब-याच प्रयत्न करूनही शासकीय योजनेतून कर्ज स्वरुपाचे अर्थसहाय्य न मिळाल्याने, जामिनदार म्हणून कोणीही विश्वासार्ह न मिळणे अशा नाना समस्या नव उद्योगकांसाठी येत असताना शेवटी उद्योजक क्षेत्रातून बाहेर पडतो, हि खंत सुरुवातीला युवा वर्ग आणि महिला सबलीकरण, सक्षमीकरण अभियान चालवणारे आम्रपाली सेवाभावी संस्था, मुंबई (रजि.)चे अध्यक्ष आयु. जितेंद्र स. कांबळे गुरुजी यांनी उपस्थित उद्योजकांच्या समस्या मांडल्या तर

भारत सरकारच्या PMFME योजना विषयी सविस्तर माहिती देत असताना पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत उद्योग कसा निर्माण करावा ? आवश्यक यांत्रिक सामुग्री कुठून कशी मिळवावी? व्यावसायिक आर्थिक प्रकल्प अहवाल कसा तयार करावा? शासकीय ऑनलाईन अर्ज कसा भरता येईल ? त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ? आपला व्यवसाय कशा प्रकारे सादर करावा ? आणि तो वाढवण्यासाठी योजनेचा लाभ कसा घेता येईल ? याची विस्तृतरित्या शासकीय कृषी मुंबई आणि ठाणे जिल्हा समन्वयक अधिकारी आयु. रविंद्र तांबे सरांनी माहिती दिली. शिबिराला उपस्थित युवा आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. 

मैत्रांगण सामाजिक संस्था आणि सेलिब्रेशन झोन केक शॉप टीम तर्फे भरविण्यात आलेल्या शिबिरासाठी   

आम्रपाली सेवाभावी संस्था मुंबई (रजि.) चे अध्यक्ष आयु. जितेंद्र स. कांबळे गुरुजी; आम्रपाली महिला बचत गटा च्या अध्यक्षा लताताई चांदमारे यांनी विशेष सहकार्य केले तर 

तालुकास्तरीय विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती अध्यक्षा वत्सलाताई हिरे;आस्था उद्योग समुहाचे संचालक सागर गांगुर्डे आणि ख्वाजा गरीब नवाझ संस्था अध्यक्षा शबनम शेख मॅडम ह्यांची विशेष उपस्थिती होती तर विश्वशांती बुध्द विहार कार्यालय शिबीराकरीता देऊन विश्वशांती बुध्द विहार कमिटी ने बुध्द वंदना वर्ग घेत असताना बुध्द विहारातून वास्तविक जीवनाशी निगडित समस्यांवर मात करणारे आधुनिक काळातील आवश्यक उपक्रम राबविणारे संस्कारीक मार्गदर्शन शिबीर राबविण्याचा पायंडा रुजवला.

मैत्रांगण सामाजिक संस्था आणि सेलिब्रेशन झोन केक शॉप टीम चे प्रमुख स्वप्निल कदम यांनी आधुनिक काळामध्ये मनुष्याला सर्व बाजुने सक्षम करणारे उपक्रम राबविणे, हि काळाची गरज जाणून मुंबई आणि उपनगरच्या विविध वसाहतीतून असे शिबीर राबवून जन सामान्यांपर्यंत शासकीय योजना प्रत्यक्ष राबविण्याचा संकल्प घेऊन शिबीराचा समारोप झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here