Home latest News कंत्राटी कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश

कंत्राटी कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश

131

कंत्राटी कामगारांचा भाजप मध्ये प्रवेश

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:  8830857351

चंद्रपूर,13 मार्च: येथील विठ्ठल मंदिर वॉर्डातील हनुमान मंदिरात बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत कार्यशाळेचे आयोजन वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मंगंटीवार, ओबीसी मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या सूचने अनुसार करण्यात आले. यावेळी मध्य मंडळ अध्यक्ष सचिन उर्फ बाळू कोतपल्लीवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागातील शेकडो कंत्राटी कामगार व युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. येथील हनुमान मंदिरात प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी महानगर अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, रामजी लखिया, मध्य मंडळ अध्यक्ष सचिन उर्फ बाळू कोतपल्लीवार, एड.सुरेश तालेवार, मध्यमंडळ सरचिटणीस संतोष वडापल्लीवार, सैय्यद चांद, राजू जोशी, गणेश रामगुंडवार, रवी चहारे, अरविंद कोळणकर आदींच्या उपस्थितीत शेकडो युवक सहभागी झाले होते. यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजप चा दुपट्टा घातला. यावेळी नसीब गेडाम, बंडू जुमनाके, प्रवीण कांबळे, विनोद गेडाम, चंद्रशेखर निमगडे, रूपेश पेटकुले, रमेश वाढई, संतोष कुमरे, संदीप महाजन, आकाश रुडे, प्रमोद उंदिरवाडे, सुभाष राजपाली, अजय रामटेके, नंदकिशोर गावडे, निमगडे, निमगडे, निमगडे, एन. अजय भगत, सचिन वाडके यांच्यासह कंत्राटी कामगारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नकुल आचार्य, निशिकांत महागावकर, सुभाष आदमने, मोहन मंचर्लावार आदींनी अथक परिश्रम घेतले.