डॉ. महेश पापडकर यांचे दुःखद निधन; सर्व सामान्य माणसाचा डॉक्टर आज देसाईगंज वासीयांनी गमावला.
देसाईगंज परिसरात सर्वत्र शोककळा.
✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
देसाईगंज :- सर्व सामान्याचा डॉक्टर म्हणून परिचित असलेले तसेच माजी नगराध्यक्ष डॉ० महेश पापडकर यांचे आज दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास नागपूर येथील दवाखान्यात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच देसाईगंज शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
एक खरा डॉक्टर कसा असावा ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. पापडकर होते. त्यांच्या जाण्याने शहराचे अकल्पित नुकसान झाले आहे, मृदू स्वभाव आणि योग्य बोलीभाषा यामुळे त्यांचाकडे आसपास च्या परिसरातील सुद्धा लोक तपासणीसाठी येत होते, अशा या परिस्थितीत त्यांच्या परिवाराला या दुःखातुन् सावरण्याची शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि देसाईगंज वासीयांकडुन भावपुर्ण श्रध्दांजली.